मुळशी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पहिला प्रेम विवाह झालेला असतानाही तरुणाचा सोबत काम करणाऱ्या तरुणीवर जीव जडला. यातूनच तिच्यासोबत लव्ह मॅरेज करण्यासाठी पत्नीचाच काटा काढल्याची भयानक घटना पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
स्वप्नील विभिषण सावंत (वय 23, मुळ रा. सांगवी, ता. आष्टी, जि. बीड) असे आरोपी पतीचे नाव आहे. प्रियांका क्षेत्रे (वय 22 वर्ष) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. ( Men Killed His Wife To Marry With Girlfriend Mulshi Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अत्यंत भयानक पद्धतीने पत्नीला संपवलं…
स्वप्नीलने त्याच्या पत्नीला मारण्यासाठी निवडलेली पद्धत सर्वांनाच घाबरवणारी आहे. मुळशी तालुक्यातील घोटवडे फाटा येथे एका खासगी रुग्णालयात स्वप्नील सावंत कामाला होता. प्रियांका क्षेत्रे सोबत प्रेम विवाह झाल्यानंतर ते दोघे कासार आंबोली येथे भाड्याची खोली घेऊन राहत होते. दरम्यान स्वप्नीलचे काम करत असलेल्या रुग्णालयातील एका परिचारिका तरुणीसोबत प्रेम संबंध जुळले. मात्र पहिले लग्न झाले असताना दुसरे लग्न कसे करायचे, या चिंतेने तो ग्रासला होता आणि त्यातूनच त्यांने भयंकर पाऊल उचलले.
पत्नीला कोणताही त्रास नसताना स्वप्नील हॉस्पिटलमधून बीपी आणि शुगरचे इंजेक्शन चोरुन तिला घरी जबरदस्ती देत राहिला. त्याने प्रियांकाला त्रास होऊ लागला आणि त्याने तिला घरातच मारुन टाकले. पण त्यांनंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा बनाव केला. मात्र, डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. तसेच प्रियांकाच्या कुटुंबीयांनीही त्याच्याबद्दल तक्रार केली. तेव्हा पोलिस तपासात ही सर्व बाब समोर आली. पुढील तपास पौड पोलिस करत आहेत. ( Men Killed His Wife To Marry With Girlfriend Mulshi Taluka )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे । हातचलाखीने एटीएम काढून घेत वयोवृद्ध व्यक्तीची 85 हजारांची फसवणूक
– मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली येथील खोल कुंडात बुडून 23 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू