पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग अखेर मोकळा होणार आहे. निगडीपर्यंतच्या मेट्रोचा राज्य सरकारचा प्रस्ताव आपल्याकडे आला आहे. त्या प्रस्तावाला येत्या दिवसाच्या आत मान्यता देण्याचे आश्वासन केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिले असल्याचे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. त्यामुळे निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बारणे म्हणाले. ( metro will run till nigdi said MP Shrirang Barane )
पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी हा मेट्रो मार्ग होता. आता पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय हा १३.९ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे. पिंपरी नव्हे निगडीपर्यंत मेट्रो सुरु करण्याची शहरवासीयांची मागणी आहे. खासदार बारणे यांच्या पाठपुराव्याने राज्य शासनाने निगडीपर्यंतच्या मेट्रोचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. त्या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी खासदार बारणे यांनी आज (गुरुवारी) संसद भवनात मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतली. निगडीपर्यंतच्या मेट्रोला मान्यता देण्याची विनंती केली. त्यावर येत्या सात दिवसात मान्यता देण्याचे आश्वासन मंत्री पुरी यांनी दिले.
खासदार बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या दोन दशकांत झपाट्याने नागरीकरण आणि लक्षणीय लोकसंख्या आणि रोजगार वाढ झाली आहे. शहराची लोकसंख्या 2011 मध्ये 17.27 लाखांवरून 2017 मध्ये अंदाजे 21 लाखांपर्यंत वाढली आहे. 2028 पर्यंत 30.9 लाख आणि 2038 पर्यंत 39.1 लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. आकुर्डी, चिंचवड आणि निगडी परिसरातील नागरिकांची निगडीपर्यंत मेट्रो सुरु करण्याची मागणी आहे. याबाबत 25 फेब्रुवारी 2022 रोजी गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाला 910.18 कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चासह सुधारित तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्यात आला आहे.
पिंपरी ते निगडी या विस्तारित मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी अशी तीन स्थानके असतील. या विस्तारित मार्गासाठी होणाऱ्या खर्चात केंद्र सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समप्रमाणात वाटा असेल. हा प्रस्तावित कॉरिडॉर 4.13 किमी लांबीचा असून तो एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणून बांधला जाईल. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंदाजे खर्च 910.18 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावाला तत्काळ मान्यता दिल्यास पिंपरी महापालिका ते निगडीपर्यंतचा विस्तार विहित मुदतीत पूर्ण होईल. वाहतूक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांना चांगली कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हा मेट्रो प्रकल्प आवश्यक आहे. त्यामुळे याला तत्काळ मान्यता देण्याची विनंती खासदार बारणे यांनी केली. त्यावर येत्या सात दिवसात मान्यता देण्याचे आश्वासन मंत्री पुरी यांनी दिले. त्यामुळे निगडीपर्यंतचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ( metro will run till nigdi said MP Shrirang Barane )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘आमच्या शेतकऱ्यांचे रक्तरंजित पाणी तुम्हाला प्यायचे आहे का?’, पवना जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करा, नाहीतर…
– पुण्यात 6 ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिर; वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे गरजू रुग्णांवर होणार उपचार
– ‘शिक्षक आजीवन शिक्षकच असतो, तो कधीही माजी होत नाही, फक्त शासकीय नियमाने सेवानिवृत्त होतो’ – अनिल गुंजाळ