तळेगाव दाभाडे येथील कैकाडी समाजाच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित समस्यांबाबत मंगळवारी (दि. 13) राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रालयीन दालनात बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार सुनिल शेळके आणि अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होते. कैकाडी समाजाच्या नागरिकांनी अनेकदा आमदार शेळके यांची भेट घेऊन समस्यांचे गाऱ्हाणे मांडले होते. त्यानंतर आमदार शेळके यांनी मंत्रि महोदयांकडे त्याबाबत माहिती दिली होती. त्या अनुषंगाने ही बैठक पार पडली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा
सदर बैठकीत तळेगाव येथील कैकाडी समाजाच्या विविध समस्या मंत्री विखे पाटील यांनी जाणून घेतल्या. तसेच समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश मंत्री महोदयांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला पुणे भूमी अभिलेख विभागाचे अधिक्षक सूर्यकांत मोरे, मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तळेगाव दाभाडे नगरपरिषद मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ( meeting concluded in presence of Minister Radhakrishna Vikhe Patil and MLA Sunil Shelke regarding problems of Kaikadi Samaj In Talegaon Dabhade )
अधिक वाचा –
– ‘तालुक्याचं गाव पण विजेचा बारा महिने लपंडाव’, वडगाव शहरातील वीज विषयक समस्यांबाबत राष्ट्रवादीचे महावितरणला निवेदन । Vadgaon Maval
– ‘अर्थ समजून घेत प्रेम व्यक्त करुया…’, व्हॅलेंटाईन डे बद्दल तरुणाईच्या ‘मन की बात’ नक्की वाचा । Valentine’s Day 2024
– वडगाव येथे गुरुवारी मावळ तालुक्याची आमसभा! आमसभा म्हणजे काय? आमसभेचे कामकाज कसे चालते? जाणून घ्या । Sunil Shelke Amasabha