व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना आणि इंद्रायणी नदी स्वच्छतेच्या कामाला तत्वतः मंजुरी; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

पवना, इंद्रायणी नदी स्वच्छतेच्या प्रश्न सरकारने गांभीर्याने घेतला आहे. उगमस्थानापासूनच नदी प्रदुषित होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 23, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
river-cleaning

Photo Courtesy : Twitter / MP Shrirang Barne


पवना, इंद्रायणी नदी स्वच्छतेच्या प्रश्न सरकारने गांभीर्याने घेतला आहे. उगमस्थानापासूनच नदी प्रदुषित होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. नदी सुधारचा विकास आराखडा (डीपीआर) तयार करुन दोन ते तीन वर्षात काम पूर्ण होईल. या कामाला तत्वतः मंजुरी दिल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. एमआयडीसीतील रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात सोडू नये अशा सूचना अधिका-यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी नदी सुधारचा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला आहे. त्यांच्या पाठपुराव्यानुसार उद्योगमंत्री सामंत यांनी आज (गुरुवारी, दिनांक 22 जून) पिंपरी महापालिकेत पवना, इंद्रायणी नदी स्वच्छतेबाबत बैठक घेतली. बैठकीला महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद, एमआयडीसीचे सीईओ बिपीन शर्मा, महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल आदी उपस्थित होते. ( minister uday samant said that state government approved work of cleaning pavana and indrayani rivers )

मंत्री सामंत म्हणाले, नदी सुधारसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्यामध्ये खासदारांचा समावेश असेल. नदी सुधारचा आराखडा तयार करण्याचे निर्देश केले आहेत. तीन महिन्यांत आराखडा तयार होईल. कामासाठी एक ते दीड हजार कोटी खर्च येवू शकतो. त्याचा भार एमआयडीसी, महापालिका उचलणार आहे. अतिरिक्त निधी लागला तर तो निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. नदी स्वच्छ ठेवण्याची वारकऱ्यांची मागणी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केली जाणार आहे. पवना, इंद्रायणी या दोनही नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत. एमआयडीसीच्या कंपन्यांकडून नदीपात्रात पाणी जात असेल, तर त्यासाठी एसटीपी करायचा की सीईटीपी करायचा यावर निर्णय घेतला जाईल. एमआयडीसीचे पाणी नदीत जावू नये यासाठी पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत नदी स्वच्छतेच्या कामाला सुरुवात होईल. दोन वर्षात काम पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. परंतु, काही परवानगीच्या अडचणी आल्यास तीन वर्षात नदी स्वच्छतेचे काम पूर्ण झालेले दिसेल.

खासदार बारणे म्हणाले, नदी सुधारसाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नदी सुधारचा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत बैठक झाल्यानंतर उद्योगमंत्री सामंत यांनी शहरात येवून बैठक घेतली. नदी सुधारच्या कामाला मंजुरी दिली आहे. ऑक्टोबरपर्यंत डीपीआर तयार केला जाईल. नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाणार आहे. पवना, इंद्रायणी नद्यांचे प्रदूषण उगमस्थानापसूनच रोखण्यात येणार आहे. ( minister uday samant said that state government approved work of cleaning pavana and indrayani rivers )

अधिक वाचा –
– पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचे काम मार्गी लागणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता
– मोदी@9 : भाजपाचे मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडेंच्या उपस्थितीत ‘घर घर मोदी’ अभियानाचा वडगाव शहरात प्रारंभ


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी सोमनाथ कालेकर तर उपाध्यक्षपदी विठ्ठल पाठारे; पाहा संपूर्ण कार्यकारिणी

Next Post

साते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गणेश बोऱ्हाडे यांची बिनविरोध निवड

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
sate-village-maval

साते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गणेश बोऱ्हाडे यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.