व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

औरंगाबादमधून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची कामशेत पोलिसांकडून चिखलसे गावाजवळ सुटका; अट्टल आरोपी अटकेत

अल्पवयीन मुलीबाबत अधिक माहिती घेतली असता तिच्या वडीलांनी वाळुंज पोलीस स्टेशन, औरंगाबाद शहर इथे अगोदरच फिर्याद दाखल केल्याचे समजले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 4, 2023
in लोकल, ग्रामीण, महाराष्ट्र
Kamshet-Police-Station

File Photo : Kamshet Police Station


दिनांक 02 ऑगस्ट 2023 रोजी रात्री लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना चिखलसे गावाजवळ स्विफ्ट कारमध्ये अल्पवयीन मुलगी तिच्यासोबत संशयित व्यक्ती असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी याबाबत कामशेत पोलिस स्टेशनला कळवले असता कामशेत पोलिस स्टेशनकडील पोलिस निरिक्षक रवींद्र पाटील, पोसई शुभम चव्हाण, पोलीस हवालदार गणेश तावरे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल ननवरे, पोलीस कॉन्स्टेबल खाडे, होमगार्ड लोखंडे असे पथक लागलीच रवाना होऊन सदर गाडीचा शोध घेतला. त्यावेळी चिखलसे गावाजवळील एका सोसायटीच्या पार्किंग मध्ये स्विफ्ट कार दिसून आल्याने त्या सोसायटीत पाहिजे असलेल्या व्यक्तींचा शोध घेतला असता अल्पवयीन मुलगी व संशयित मिळाले.

अल्पवयीन मुलीला पळवुन आणणाऱ्या व्यक्तीचे नाव संतोष कांबळे असल्याचे आणि तो बाहेर गेल्याचे समजले, पण त्याचा मित्र ओंकार विठ्ठल रोडे (रा. वाळुंज, औरंगाबाद) याला पोलिसांनी शिताफीने पकडून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता तो अहमदनगर जिल्ह्यातील तोफखाना पोलीस स्टेशन तसेच कोतवाली पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टरवरील विविध गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याची माहिती मिळाली. ( minor girl kidnapped from aurangabad was rescued by kamshet police maval )

अल्पवयीन मुलीबाबत अधिक माहिती घेतली असता तिच्या वडीलांनी वाळुंज पोलीस स्टेशन, औरंगाबाद शहर इथे अगोदरच फिर्याद दाखल केल्याचे समजले. त्यानुसार वाळुंज पोलीस स्टेशन इथे संपर्क साधला. त्यानंतर सपोनि अमोल डोके व त्यांची पोलीस टीम मुलीचे वडील, मामा यांच्यासह कामशेत पोलीस स्टेशनला हजर झाले आणि सदर अल्पवयीन मुलीला, अल्पवयीन मुलीच्या गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार असे दोन्ही पुढील तपासासाठी औरंगाबाद शहर पोलिसांच्या ताब्यात दिले गेले. तसेच मिळून आलेला फरारी आरोपी ओंकार रोडे याला कोतवाली पोलीस स्टेशन कडील पोलीस कॉन्स्टेबल हिवाळे यांच्या ताब्यात दिले.

सदरची कारवाई पोलीस , पुणे ग्रामीण अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मितेश घट्टे, सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस स्टेशनकडील पोलिस निरिक्षक रवींद्र पाटील, पोसई शुभम चव्हाण, पोलीस हवालदार गणेश तावरे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल ननवरे पोलीस कॉन्स्टेबल खाडे होमगार्ड लोखंडे लोणावळा डिव्हिजन पथकाकडील पोलीस कॉन्स्टेबल तुषार शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अकोलकर यांनी केली आहे. ( minor girl kidnapped from aurangabad was rescued by kamshet police maval )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कुरवंडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी साधना यादव बिनविरोध । Maval Politics
– महाराष्ट्राचा रानकवी हरपला..! ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे पुण्यात निधन
– महत्वाची बातमी! पुणे रिंग रोडसाठी आतापर्यंत 125 एकराचा ताबा, जमीन मालकांना 250 कोटींचा मोबदला वाटप । Pune Ring Road


Previous Post

तळेगाव दाभाडे, देहूरोड, आकुर्डी, चिंचवड रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट; पंतप्रधान मोदींच्या हस्ते रविवारी भूमिपूजन

Next Post

पुण्यात तलवारीने दहशत निर्माण करून पसार झालेल्या आरोपीला तुंग किल्ला परिसरातून अटक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
crime-arrested

पुण्यात तलवारीने दहशत निर्माण करून पसार झालेल्या आरोपीला तुंग किल्ला परिसरातून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.