तळेगाव दाभाडे शहरात होणारे छोटे-मोठे गुन्हे काही केल्या थांबताना किंवा कमी होताना दिसत नाही. आता पुन्हा एकदा तळेगाव शहराच्या भर रस्त्यावर महिला दुचाकीस्वारासोबत घडलेल्या गंभीर प्रकारामुळे शहरात पोलिसांचा धाक कमी झालाय की काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. ( Misbehaves With Bike Rider Woman At Talegaon Dabhade Police Arrested Auto Rickshaw Driver )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मंगळवार (10 जानेवारी) रोजी तळेगाव दाभाडे शहरातील शिवाजी चौक भागातून वेगाने येत असलेल्या रिक्षाने समोरील दुचाकीला जोरात धडक दिली. तळेगाव-वडगाव रोडवर मराठा क्रांती चौकासमोर ही घटना घडली. यावेळी धडक बसलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे दुचाकीस्वार महिलेने सदर रिक्षाचालकाला याबाबत जाब विचारला. तेव्हा मुजोर रिक्षाचालकाने महिलेसोबत गैरवर्तन केले.
महिलेने याबाबत तळेगाव दाभाडे पोलिसांत फिर्याद दाखल केली. महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सदर रिक्षा चालक दिलीप महादु डोळस (वय 59 रा. माळवाडी, वराळे रस्ता, ता. मावळ) विरोधात भा.दं.वि. 354, 294, 509, 279, 336 आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
अधिक वाचा –
– धक्कादायक घटना! मावळ तालुक्यातील चांदखेड गावच्या यात्रेत गावगुंडाकडून हवेत गोळीबार, पोलिसांची तातडीने कारवाई
– मावळात हे काय सुरूये? तळेगाव दाभाडेत भरदिवसा व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून 10 लाख लंपास