Dainik Maval News : मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सोमवारी (दि.10) विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पात त्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत महत्वाची घोषणा केली. मिसिंग लिंक हा प्रकल्प येत्या ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. ( mumbai pune missing link )
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ऑगस्ट, 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीत बचत होईल व वाहतूक कोंडीतूनही सुटका होईल, असे अजित पवार यांनी घोषित केले.
- देशभरात वाहतूक कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबवले जात आहेत. यामध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून ऑगस्ट 2025 पर्यंत हा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे.
मुंबई ते पुणे प्रवासाचे अंतर कमी होणार
‘मिसिंग लिंक’ या नवीन मार्गाचा उपयोग केल्यास मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर प्रवास करणाऱ्यांचा सुमारे 30 मिनिटांचा वेळ वाचेल. हा प्रकल्प 2019 मध्ये सुरू करण्यात आला होता आणि तो 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, कोरोना महामारीच्या काळात काम ठप्प झाल्याने प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. परंतु आता हा प्रकल्प पुर्णत्वास जात आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News
– संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव
– रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका