लोणावळा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देवघर येथील एका बेपत्ता महिलेचा मृतदेह जवळील विहिरीत आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. निशा मोहन देशमुख (वय 34) हि महिला आदल्या दिवसापासून घरातून बेपत्ता होती. तिचा शोध सुरु होता, अशात विहिरीजवळ तिची ओढणी आढळली. त्यानंतर विहिरीच्या इथे शोध घेतला असता, तिचा मृतदेह विहिरीच्या पाण्यात आढळून आला आहे. ( Missing Woman Dead Body Found In Well Devghar Wakasai Near Lonavala Maval Crime )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लोणावळा ग्रामीण पोलिस, शिवदुर्ग मित्र मंडळ, लोणावळा आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले होते. तत्पूर्वी गावकऱ्यांनीच महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला होता. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहेत.
अधिक वाचा –
– नाणेघाटात तब्बल 1200 फूट खोल दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्याचा थरार! शिवदुर्ग टीमची साहसी कामगिरी
– प्राणीमित्रांनी घडवली आई आणि पिल्लांची भेट; बाथरुममध्ये अडकलेल्या उदमांजराच्या पिल्लांची सुटका – पाहा व्हिडिओ