Dainik Maval News : चंद्रकांत पाटील हे मुंबईहून पुण्याकडे परतत असताना मळवली (ता.मावळ) येथे क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून संपर्क बालग्राम संस्थेस उपयोगी साहित्य भेट देण्याचा व आमदार पाटील यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी, संपर्क संस्था बालग्रामच्या माध्यमातून अनाथ मुलामुलींचा सांभाळ करून त्यांचे शिक्षण पूर्ण करणे व पुढे लग्नही लावून देण्याचे कौतुकास्पद कार्य करीत आहे. मी ह्या संस्थेच्या सर्व शाखांना सर्वोतोपरी मदत करेन, असे आश्वासन आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले.
संपर्क बालग्राममधील १३० विद्यार्थ्यांना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते चादरी तसेच स्पीकर सेट भेट देण्यात आले. ‘बालग्राम संस्था खूप चांगलं काम करीत असून एवढ्या अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचे महत्वपूर्ण काम करीत आहे. त्यामुळे मी देखील शासनाच्या स्तरावर आणि वैयक्तिक सीएसआर निधीतून संस्थेसाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करेन’ असे चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, विश्वस्त सतीश कोंडाळकर, बालग्रामचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, सामाजिक कार्यकर्ते सचिन निंबाळकर, चेतन जोशी, संस्थेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पवनानगर येथील व्याख्यानात वसंत हंकारे यांच्याकडून ‘बाप समजावून घेताना’ हजारो विद्यार्थ्यांना भावना अनावर । Pavananagar
– पवना धरणात 2 युवक बुडाल्याचे प्रकरण : बंगला मालकासह नाव मालकाविरुद्ध गुन्हा दाखल । Pavana Dam News
– मावळ तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान राबविले जाणार । Maval News