राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी रविवारी (दि. 8 ऑक्टोबर) रोजी जनरल मोटर्सच्या कामगार संघटनेने पुकारलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी कामगारांशी चर्चा केली आहे. संपूर्ण प्रकरण समजावून घेतले. यावेळी बोलताना त्यांनी, ‘हे सरकार सध्या कोणाला मंत्रिपद द्यायचे, महामंडळात किती जागा कुणी घ्यायच्या या चर्चेत गुंग झाले आहे. स्वतःचे हित पाहणारे हे सरकार आहे. त्यांना कामगारांचे, शेतकऱ्यांचे व इतर महत्वाच्या समस्यांबाबत काहीही घणेदेणे नाही,’ अशी टीका रोहत पवार यांनी मनोगत व्यक्त करताना केली. ( mla rohit pawar visited maval general motors company workers agitation )
जनरल मोटर्स कामगार संघटनेने पुकारलेल्या बेमुदत साखळी उपोषणाचा रविवारी सातवा दिवस होता. गेल्या सात दिवसापासून संपूर्ण परिवारासह उपोषणाला बसलेल्या कामगारांच्या हाताला काम नसल्याने दैनंदिन अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. जनरल मोटर्सच्या कामगारांचे सर्व प्रश्न समजावून घेत, कामगारांच्या न्याय हक्कासाठी शरद पवार यांच्यासोबत चर्चा करून युवकांच्या रोजगारासाठी पुढील 40 दिवस पुणे ते नागपूर 850 कि.मी पायी प्रवास करणार आहे, तसेच अधिवेशनात हा विषय मांडून कामगारांना पूर्णतः सहकार्याची भूमिका व्यक्त करत रोहित पवार यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
“मी जनरल मोटर्सच्या कामगारांच्या प्रश्नाबाबत शरद पवारांबरोबर देखील चर्चा केली आहे. त्यांनाही हा प्रश्न माहिती आहे. तुम्ही जी एकजूट दाखवली आहे, त्यामुळे तुमचा विजय निश्तिच होईल. दोन-तीन दिवसांत तुम्हाला गुडन्यूज येईल. तुमचे प्रश्न मार्ग न लागल्यास अनेक आमदार तुम्हाला पाठींबा देतील. कामगार मंत्र्यांनीच जनरल मोटर्स कामगारांवर अन्याय केला असल्याने ते येतील असे मला वाटत नाही.” असे रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भाजपावर सडकून टीका –
“राज्यात भाजपाचे सरकार आले की ते राज्यातील जनतेवर अन्याय करते. गुजरातचे भले करते. राज्यात येणाऱ्या कंपन्या यांनी गुजरातला पाठवल्या. हे सरकार स्वतःचे हित पाहण्यासाठी व्यस्त झाले आहे. नांदेडला एवढी मोठी घटना घडली, त्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीतील नेत्यांबरोबर गप्पा मारण्यात व्यस्त झाले होते.” अशी टीकाही रोहित पवारांनी केली.
‘जनरल मोटर्स’च्या सर्व कामगारांच्या नोकऱ्या सेवा शर्तीसह नवीन येणाऱ्या Hyundai motors कंपनीमध्ये हस्तांतरित कराव्यात, अशी जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांची मागणी असून त्यासाठी एक हजार कामगारांचं त्यांच्या कुटुंबियांसह तळेगाव इथं गेल्या 7 दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. या… pic.twitter.com/k54tJUvrHQ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 9, 2023
जनरल मोटर्स कंपनी प्रकरण नक्की काय आहे?
जनरल मोटर्स ही तळेगाव एमआयडीसीतील मोठी कंपनी असून हजारो कामगारांचे कुटुंब या कंपनीवर अवलंबून होते. परंतू कंपनीने प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतल्याने येथील कामगार देशोधडीला लागले असून त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. कामगार संघटनेकडून न्यायालयासह विविध पातळीवर संघर्ष सुरु आहे. जे कामगार ऐन तारुण्यात वयाच्या पंचविशीत कंपनीत रुजू झाले. सुमारे 13 वर्ष कायमस्वरुपी म्हणून काम केल्यानंतर अचानक त्यांच्या हक्काचा रोजगार त्यांच्याकडून हिरावला जातोय. तर दुसरीकडे आज सद्यस्थितीत वयाच्या चाळीशीत असणाऱ्या कामगारांना कुठे कायमस्वरुपी नोकरी मिळत नाहीये. कंत्राटी नोकरीवर त्यांचे कुटुंब चालवता येत नाही, अशा अनेक समस्या त्यांच्यापुढे निर्माण झाल्या आहेत. अखेर जनरल मोटर्स कंपनीतील 1 हजार अन्यायग्रस्त कामगारांनी त्यांच्या न्याय आणि हक्कांसाठी संपूर्ण कुटुंबीयांसमवेत जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत तळेगाव एमआयडीसीच्या प्रवेशद्वारावर ‘बेमुदत साखळी उपोषणाला’ सुरुवात केली आहे. उपोषण सुरु होऊन सात दिवस उलटले आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– काँग्रेस (आय) पक्षाच्या वडगांव मावळ शहर अध्यक्षपदी बाळासाहेब चव्हाण यांची नियुक्ती । Maval Taluka Politics
– एकता प्रतिष्ठाण डोणे आयोजित श्री डोणुआई देवी नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी चैत्राली लांडगे यांची निवड
– धक्कादायक! सुनेकडून सासूला बेदम मारहाण, महाराष्ट्रातील संतापजनक प्रकार, घटना सीसीटीव्हीत कैद – Viral Video