Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे नवनियुक्त पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, विठ्ठल शिंदे आणि राजेंद्र कोरेकर पाटील यांचा पक्षाकडून सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात हा सत्कार समारंभ संपन्न झाला.
भोर-राजगड-मुळशी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी पक्षाचे पुणे ग्रामीण भागातील १३ तालुक्यांचे तालुका अध्यक्ष, आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची भूमिका निश्चितच महत्त्वाची ठरेल असा विश्वास श्री. मांडेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमात मुळशी तालुक्यातील भालगुडी गावचे माजी सरपंच रामदास साठे, माजी उपसरपंच सहादू साठे, अंकुश साठे, कोळवण सोसायटीचे माजी अध्यक्ष सिताराम धिडे, माजी अध्यक्ष भाऊसाहेब टेमघरे तसेच सामाजिक कार्यकर्ते भरत साठे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यात तीन जिल्हाध्यक्ष
संभाजी होळकर – बारामती, इंदापूर, पुरंदर आणि दौंड या तालुक्यांची जबाबदारी संभाजी नाना होळकर यांच्याकडे देण्यात आली आहे. होळकर हे अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेत काम करीत असून पक्षफुटीच्या काळातही ते अजित पवारांसोबत राहिले. जवळपास तेरा वर्षांहून अधिक काळ होळकर हे बारामती तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
राजेंद्र कोरेकर – शिरूर, जुन्नर, खेड आणि आंबेगाव, हवेली या तालुक्यांची जबाबदारी राजेंद्र कोरेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अजित पवार यांचे खंदे समर्थक आणि पक्ष संघटनेत सक्रीय कार्य करणारा नेता नव्हे कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.
विठ्ठलराव शिंदे – राजगड, भोर, मुळशी आणि मावळ या तालुक्यांची जबाबदारी विठ्ठलराव शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष, अजित पवार आणि आमदार सुनील शेळके यांचे विश्वासू असलेले विठ्ठलराव शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुणे जाणते नेतृत्व आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षासह तीन स्वीकृत नगरसेवकांची होणार निवड ; मंगळवारी पालिकेची पहिली सभा
– अजित पवारांचा मोठा निर्णय ! एक दोन नव्हे तर तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी मास्टर प्लॅन
– वडगाव नगरपंचायतीत भाजपाकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी संदीप म्हाळसकर यांचे नाव जवळपास निश्चित
– मोठी बातमी ! विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
