Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. नगरपरिषद, नगरपंचायत सोबत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मावळ निवडणुकीकरिता सर्वत्र राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. वेगवेगळ्या पंचायत समिती गणात आणि जिल्हा परिषद गटात इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. अशात शनिवारी ( दि. 25 ऑक्टोबर ) आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पंचायत समितीचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे.
शनिवारी चांदखेड येथे मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त पै. मनोहर उर्फ मनोज येवले युवा मंच आणि कुलस्वामिनी महिला मंच यांच्या माध्यमातून “खेळ पैठणीचा सौ-भाग्यवती मावळ-2025 आणि लकी ड्रॉ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार सुनील शेळके उपस्थित होते.
दरम्यान कार्यक्रमात मनोगत व्यक्त करीत असताना आमदार सुनील शेळके यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आमदार शेळके यांनी चांदखेड गणातून पंचायत समितीकरिता मा. सरपंच मनोज येवले यांच्या पत्नी सुनिता मनोज येवले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मावळ पंचायत समितीकरिता पहिला उमेदवार जाहीर करीत असल्याचे सांगत आमदार सुनील शेळके यांनी चांदखेड गणातून सुनिता मनोज येवले यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली.
मावळ पंचायत समितीचे एकूण दहा गण आहेत. यात यंदाचे पंचायत समितीचे सभापती पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री करिता आरक्षित आहे. तसेच चांदखेड गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रि करिता आरक्षित आहे. त्यामुळे पंचायत समितीचा पहिला उमेदवार जाहीर करण्यासोबत आमदार सुनील शेळके यांनी सभापती पदाचाही उमेदवार जाहीर केल्याचे बोलले जात आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगावचे नवीन पोलीस निरिक्षक अभिजित देशमुख यांची धडाकेबाज कामगिरी ; डोणे गावातील अवैध दारूभट्टी केली उध्वस्त
– मुरलीधर मोहोळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची ऑफर… काय आहे किस्सा ? वाचा सविस्तर । Murlidhar Mohol
– भरधाव वॅगनर कारच्या धडकेत गंभीर जखमी होऊन 78 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; शिरगाव पोलिसांत चालकावर गुन्हा दाखल



