Dainik Maval News : महाराष्ट्र विधानसभा 2024-25 या वर्षासाठी विधान मंडळाच्या विविध समित्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अधिवेशन संपताच सरकारकडून विधिमंडळाच्या महत्त्वाच्या समित्यांचे प्रमुख जाहीर करण्यात आले आहेत.
बुधवारी (दि.26) विधानसभा सदस्यांची विविध समितीवर नावांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात रोजगार हमी योजना समिती प्रमुख म्हणून मावळचे आमदार सुनील शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे
महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्या आणि प्रमुख
1. अंदाज समिती – अर्जुन खोतकर
2. लोकलेखा समिती – विजय वडेट्टीवार
3. सार्वजनिक उपक्रम समिती – राहुल कूल
4. पंचायत राज समिती – संतोष दानवे
5. रोजगार हमी योजना समिती – सुनील शेळके
6. उपविधान समिती – प्रतापराव पाटील चिखलीकर
7. अनुसूचित जाती कल्याण समिती – नारायण कुचे
8. अनुसूचित जमाती कल्याण समिती – दौलत दरोडा
9. विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती – सुहास कांदे
10. महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती – मोनिका राजळे
11. इतर मागासवर्ग कल्याण समिती – किसन कथोरे
12. अल्पसंख्यांक कल्याण समिती – मुरजी पटेल
13. मराठी भाषा समिती – आशुतोष काळे
14. विधानसभेच्या समित्या विशेषधिकार समिती – नरेंद्र भोंडेकर
15. विनंती अर्ज समिती – अण्णा बनसोडे
16. आश्वासन समिती – रवी राणा
17. नियम समिती – राहुल नार्वेकर
18. सदस्य अनुपस्थिती समिती – किरण लहामटे
19. अशासकीय विधेयके व ठराव समिती – चंद्रदीप नरके
20. सदस्यांचे वेतन व भत्ते याबाबत संयुक्त समिती – अजित पवार
21. विधान मंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्तीवेतनाबाबत संयुक्त समिती – अजित पवार
22. ग्रंथालय समिती – प्राध्यापक राम शिंदे
23. आमदार निवास व्यवस्था समिती – शिवेंद्रसिंहराजे भोसले
24. आहार व्यवस्था समिती – डॉ बालाजी किनीकर
25. धर्मादाय खाजगी रुग्णालयाची तपासणी करणे समिती – डॉक्टर आशिष जयस्वाल
26. वातावरणीय बदल संदर्भातील संयुक्त समिती – राम शिंदे
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान
