Dainik Maval News : विविध सामाजिक संघटनांनी यावर्षीच्या गणेशोत्सवात आणि दहीहंडी उत्सवात डीजे न वापरण्याचे आवाहन केले आहे. त्याअनुषंगाने तळेगाव दाभाडे परिसरातील अकरा सामाजिक संघटनांनी आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले असून डीजे बंदी ला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे.
त्या अनुषंगाने आमदार सुनील शेळके आणि बाळा भेगडे यांनी तालुक्यातील गणेश मंडळांना आवाहन केले आहे की, गणेशोत्सवात व दहीहंडी उत्सवात डीजेच्या मोठ्या आवाजामुळे जेष्ठ नागरिक, लहान मुले व रुग्णांना त्रास होत आहे. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहे. तरी तळेगाव सह मावळ तालुक्यातील गणेश मंडळांनी डीजे मुक्त मिरवणुका काढाव्यात.
धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व जपण्यासाठी डीजे ऐवजी पारंपारिक वाद्याचा उपयोग करावा. उत्सव शांततेत भक्ती भावाने साजरा करावा, असे आवाहन दोन्ही आजी-माजी आमदारांनी सर्व गणेश मंडळांना केले आहे. तळेगाव शहर व मावळ मधील गणेश उत्सव मंडळे या आवाहानाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तसेच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी डीजे लावले तर गणेश मंडळांवर गुन्हे दाखल केले जातील असे म्हटले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाच्या मेट्रोचा डीपीआर तयार करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
– चाकण : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
– मावळमधील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर; वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर

