Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागातील एक प्रमुख ग्रामपंचायत असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत येलघोल-धनगव्हाण च्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवारी (दि. ९) संपन्न झाला. आमदार सुनील शेळके आणि मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात या इमारतीचे उद्घाटन झाले.
आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या २० लक्ष निधीतून ह्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. ग्रामपंचायतीची ही वास्तू केवळ एक इमारत नसून गावाच्या समृद्धीचे आणि आधुनिकतेचे प्रतीक आहे, असे आमदार सुनील शेळके यावेळी म्हटले. याप्रसंगी ग्रामस्थांनी अत्यंत उत्साहात मान्यवरांचे स्वागत केले. तसेच अतिशय थाटामाटात हा सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्याला आमदार शेळके यांच्यासहीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, ह.भ.प. महादेव महाराज घारे, संतोष राऊत, नितीन मुऱ्हे, मनोज येवले, प्रशांत भागवत यांच्यासह परिसरातील मान्यवर, सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षासह तीन स्वीकृत नगरसेवकांची होणार निवड ; मंगळवारी पालिकेची पहिली सभा
– अजित पवारांचा मोठा निर्णय ! एक दोन नव्हे तर तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी मास्टर प्लॅन
– वडगाव नगरपंचायतीत भाजपाकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी संदीप म्हाळसकर यांचे नाव जवळपास निश्चित
– मोठी बातमी ! विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
