Dainik Maval News : आमदार सुनील शेळके यांनी शुक्रवारी (दिनांक 14 फेब्रुवारी 2025) रोजी जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांची भेट घेतली. अनेक दिवसांपासून प्रलंबित व न सुटलेला हा प्रश्न. जनरल मोटर्स कंपनी बंद झाल्याने येथील अनेक कामगार वर्ग कुटुंब आज उघडल्यावर पडले असून आर्थिक अस्थिरतेच्या गर्तेत अडकले आहे. आमदार शेळके यांनी शुक्रवारी जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मुद्द्यावर चर्चा केली.
नवलाख उंबरे येथील जनरल मोटर्स कंपनी बंद पडल्याने सुमारे १२०० कामगारांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न उपस्थित राहिला होता. त्यावर अनेकदा आंदोलने करून सरते शेवटी सद्यस्थितीत सर्व कामगारांनी व्ही.आर.एस. घेऊन आपल्या आपल्या सेवेनुसार मोबदला घ्यावा व सदर ठिकाणी येणाऱ्या ह्युंदाई मोटर्स या कंपनीत त्यांना नोकरी देण्याबाबतचे आश्वासन देण्यात आले होते.
सद्यस्थितीत ह्युंदाई मोटर्स हा प्रकल्प सुरु झाला असुनही या स्थानिक बांधवांना नोकरी मध्ये प्राधान्य देणेकरिता गेल्या अनेक दिवसांपासून ह्युंदाई कंपनी व्यवस्थापनासोबत याबाबत चर्चा करीत आहे. सद्यस्थितीत सुमारे ६०० ते ७०० कामगार पूर्णपणे बेरोजगार असुन त्यांनी जनरल मोटर्स या कंपनीत सुमारे १० ते १२ वर्ष काम केले आहे. सध्या त्यांच्या वयोमानामुळे त्यांना इतर कंपन्यांमध्ये काम मिळणे अशक्य आहे.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून उदरनिर्वाहासाठी मावळ तालुक्यात स्थायिक झालेले कामगार बांधव सक्षम व कुशल कामगार असूनही त्यांना केवळ स्थानिक असल्याने डावलले जात असल्याचे निदर्शनास येत असल्याने कामगारांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे.
आंदोलनाच्या भूमिकेत असलेल्या या कामगारांच्या मागण्यांबाबत ह्युंदाई मोटर्स या कंपनी व्यवस्थापनास दिनांक २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत निर्णय घेण्यासाठी मुदत दिली आहे. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनासोबत कोणतीही बैठक घेणार नसुन कामगारांच्या आंदोलनात आपण स्वतः सहभागी होणार असल्याचे आमदार शेळके यांनी जाहीर करीत कामगारांना पाठबळ दिले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– चालकाचे प्रसंगावधान, दुचाकीस्वारांची मदत अन् पोलिसांची सतर्कता ; देहूरोड येथे पेटलेल्या ट्रकचा सिनेस्टाईल थरार । Dehu Road News
– दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज ‘आपले सरकार’ प्रणालीद्वारे 10 मार्च पर्यंत स्वीकारले जाणार
– सेवा रस्त्यालगतच्या व्यवसायिकांच्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा ; रस्त्यात वाहने उभी केली जात असल्याने नागरिक त्रस्त