व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

“अजून वेळ गेलेली नाही.. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंद, पण..” आमदार सुनील शेळके यांच्या विधानाने दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील, तर आनंदच आहे, अशा भावना आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केल्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 30, 2026
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Mla Sunil Shelke On Ncp Merger statement those who do not accept sunetra pawars leadership can take exit route

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : स्व. अजित दादा पवार यांचे विश्वासू व निकटवर्तीय मानले जाणारे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरूवात केली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणे शक्य असल्याचे सांगत अजूनही वेळ गेलेली नाही, असा दावा आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. याबाबत त्यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वात दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील, तर अजूनही वेळ गेलेली नाही, असे विधान करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाचा सूर लावल्याने पुन्हा एकदा विलीनीकरणाची चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले आमदार शेळके ?
आ. सुनील शेळके म्हणाले, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व जर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना मान्य असेल आणि दोन्ही पक्ष एकत्र आले तर आम्हाला त्याबाबत अभिमानच असेल. आमचा पक्ष मोठा होत असेल तर त्याबाबत सर्वांनी सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक असल्याचे शेळके म्हणाले.

ज्यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व ज्यांना मान्य नसेल, ते इतर पक्षांमध्ये प्रवेश करतील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येत असतील, तर त्याचा मला आनंद आहे, असे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील, तर आनंदच आहे, अशा भावना आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत आता कोणतीही चर्चा नसून निर्णय घ्यायचे सर्वाधिकार पक्षाच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना असल्याचे स्पष्ट केले.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनीही याबाबत पुन्हा एकदा सकारात्मक भूमिका व्यक्त केली. ते म्हणाले की, सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वाखाली जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले, तर महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याला आणि जनतेला मनापासून आनंद होईल. पक्षाचे जिल्हाध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते आणि आमदारांची अशीच इच्छा आहे की, सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकजुटीने काम करावे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव मावळ येथे ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून शहरवासीयांना दिलासा
– लोणावळ्यात एक रूपयासाठी तुफान राडा ! पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण ; 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल
– शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते तपासा ! मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण


Previous Post

Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायतीकडून दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग निधीचे वाटप

Next Post

सीआरपीएफ जवानाच्या मिसिंग प्रकरणात तळेगाव दाभाडे पोलिसांचा हलगर्जीपणा समोर ; रस्ते अपघातानंतर…

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Talegaon Dabhade police negligence exposed incident of not taking proper notice of missing CRPF jawan

सीआरपीएफ जवानाच्या मिसिंग प्रकरणात तळेगाव दाभाडे पोलिसांचा हलगर्जीपणा समोर ; रस्ते अपघातानंतर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade police negligence exposed incident of not taking proper notice of missing CRPF jawan

सीआरपीएफ जवानाच्या मिसिंग प्रकरणात तळेगाव दाभाडे पोलिसांचा हलगर्जीपणा समोर ; रस्ते अपघातानंतर…

March 30, 2026
Mla Sunil Shelke On Ncp Merger statement those who do not accept sunetra pawars leadership can take exit route

“अजून वेळ गेलेली नाही.. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंद, पण..” आमदार सुनील शेळके यांच्या विधानाने दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण

March 30, 2026
Vadgaon Nagar Panchayat Distribution of disability fund to disabled beneficiaries by Vadgaon Nagar Panchayat

Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायतीकडून दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग निधीचे वाटप

March 30, 2026
Kamshet-Police-Station

कामशेत हादरले… कामशेतमध्ये एकाचा खून ; गुन्हा लपविण्यासाठी साथीदारावर देखील जीवघेणा हल्ला । Kamshet Crime

March 30, 2026
Potoba-Maharaj-Mandir

वडगावमध्ये श्री पोटोबा महाराज उत्सव व श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा ; तीन दिवसीय यात्रेत विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम

March 30, 2026
Special Article on Occasion of seventy Fifth Birthday Of Eknathrao Tile Maval Bjp Leader

अमृतमहोत्सव एकनाथपर्वाचा !!

March 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.