Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मावळ निवडणुकीच्या अनुषंगाने मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. मावळ तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच गट आणि गणांत उमेदवारांकडून प्रचाराला सुरूवात झाली आहे. शनिवारी (दि. २४ जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोमाटणे – चांदखेड जिल्हा परिषद गटातील प्रचाराचा नारळ फोडला आणि प्रचाराचा आरंभ केला.
चांदखेड येथे आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, मा. तालुकाध्यक्ष गणेश ढोरे आदी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत श्री संत रामजीबाबा मंदिरात अगोदर दर्शन घेऊन, नंतर तळी भरून प्रचाराचा आरंभ करण्यात आला. याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक, मतदार बंधू भगिनी उपस्थित होते.
मावळ तालुक्यात सध्या होत असलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांची युती आहे. या युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेला मनिषा नितीन मुऱ्हे आणि पंचायत समितीला सुनिता मनोज येवले यांना मतदारांनी मतरूपी पाठींबा द्यावा, असे आमदार शेळके आपल्या मनोगतात म्हणाले.
महिला सक्षमीकरण आणि स्थानिक विकासाचा संकल्प घेऊन रिंगणात उतरलेल्या या भगिनींना जनसामान्यांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद विजयाची खात्री देणारा असल्याची प्रतिक्रिया आमदार शेळके यांनी दिली. तसेच, आपल्या भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि गतिमान विकासासाठी युतीच्या उमेदवारांना मतरूपी आशीर्वाद देऊन विजयी करण्याचे आवाहनही शेळके यांनी उपस्थितांना केले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– कार्ला-खडकाळा गटाच्या विकासासाठी आशाताई वायकर यांचे गणरायाला साकडे !
– राष्ट्रवादीने इंदुरी-वराळे गटात फोडला प्रचाराचा नारळ ! नवलाख उंबरे गावात प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– ‘…त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलंच नाही’ ; मावळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमने – सामने
– निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर ; जागोजागी होतेय वाहनांची तपासणी