Dainik Maval News : आंद्रा धरणातून पाण्याचा विसर्ग करताना योग्य नियोजन करण्याची गरज असल्याची मागणी आंदर मावळ विभागातील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी मावळचे आमदार सुनील शेळके, तहसीलदार विक्रम देशमुख व पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
दरम्यान, ग्रामस्थांच्या निवेदनाची तत्काळ दखल घेत आमदार सुनील शेळके यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता माणिक शिंदे, संबधित विभागाचे इतर अधिकारी व आंद्रा धरणग्रस्त शेतकरी यांची बैठक घेतली.
शेतकऱ्यांना पाणी कमी पडणार नाही, असेच नियोजन करून पाण्याचा विसर्ग करावा. प्रसंगी इतरत्र सोडले जाणारे पाणी कमी करावे पण शेतकऱ्यांना पाणी कमी पडणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना आमदार शेळके यांनी दिल्या.
मावळ तालुक्यातील आंदर मावळ विभागामध्ये आंद्रा धरण आहे. या धरणातुन अनेक गावांसाठी पाणी पुरवठा योजना सुरु आहेत. अनेक शेतकरी आपल्या शेतीसाठी याच धरणातील पाण्याचा वापर करतात. परिसरातील छोटे-मोठे अनेक उद्योग, व्यवसाय हे आंद्रा धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. यासह एमआयडीसीसाठी देखील याच धरणातून पाणीपुरवठा होत आहे.
भविष्यात वाढणाऱ्या औद्योगिक परिसरासाठी सुद्धा आंद्रा धरणातून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे आंद्रा धरणातून पाणी सोडताना योग्य नियोजन करण्यात यावे. जेणेकरून एप्रिल, मे व जुन महिन्यात धरणाच्या बॅक वॉटर भागात असणाऱ्या गावांना पाणी टंचाईची समस्या जाणवणार नाही, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था ; पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर सीएम श्री शाळा
– आता कोणत्याही कार्यक्रमावेळी ड्रोन वापरण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक, अन्यथा थेट तुरुंगवास । Pune News
– “कलाकाराला वय असते, परंतु कलेला वय नसते, ती चिरंजीव असते” – आमदार सुनिल शेळके