महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या झालेल्या भेटीगाठींमुळे राज्यात आगामी निवडणूकांसाठी मनसे आणि शिंदे गटाची युती होणार का? याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. अशातच मावळ तालुक्यात झालेल्या एका भेटीची जोरात चर्चा होत आहे. एकनाथ शिंदे गटाचे खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे आणि मावळ मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांची नुकतीच भेट झाली आहे. ( MP Shrirang Barne Meet Rupesh Mhalaskar )
खासदार बारणे ( MP Shrirang Barne ) यांनी रुपेश म्हाळसकर ( MNS Rupesh Mhalaskar ) यांची गणेशोत्सवाच्या निमित्ताने सदिच्छा भेट घेतल्याचे रुपेश म्हाळसकर यांनी सांगितले आहे. पंरतू, या भेटीमुळे मावळ तालुक्यात आगामी निवडणूकांच्या अनुषंगाने काही नवीन समिकरण उदयास येऊ शकते, असे बोलले जात आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
खासदार बारणे स्वतः म्हाळसकर यांच्या ‘मावळगड’ संपर्ककार्यालयात…
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मावळ लोकसभा क्षेत्राचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या मावळगड जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, चंद्रशेखर भोसले, भाजपा वडगाव शहराध्यक्ष अनंता कुडे, शिवसेना वडगाव शहराध्यक्ष प्रवीण ढोरे, शिवसेना तळेगाव शहराध्यक्ष मुन्ना मोरे आदी उपस्थित होते. ( MNS Ans Shinde Will Come Together Maval MP Shrirang Barne Meet Rupesh Mhalaskar )
अधिक वाचा –
विजेचा सततचा लपंडाव वडगाव शहराच्या विस्कळीत पाणीपुरवठ्याला जबाबदार!
उद्धव ठाकरेंवर प्रचंड जहरी टीका; “बापाचे नाव नसते तर एखाद्या स्टुडिओमध्ये फोटो..”