रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ ( Raje Umaji Naik Economic Development Corporation ) स्थापना करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी दिली. पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक ( Umaji Naik ) यांच्या 231 व्या जयंती सोहळा कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार चंद्रकांत बावनकुळे, गोपीचंद पडळकर, संजय जगताप, जयकुमार गोरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतरे, जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे, उपाध्यक्ष अंकुश जाधव आदी उपस्थित होते.
आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करून उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, ‘स्वराज्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय स्वातंत्र्याकरीता ज्यांनी बलिदान दिले त्या नाम-अनाम वीरांचे स्मरण होणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून स्वातंत्र्य काय असते ते दाखवून दिले. महाराजांचे किल्ले म्हणजे स्वराज्याची संपत्ती होती. त्यांच्यामागे अठरा पगड जातीचे मावळे होते.’
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती कार्यक्रमाला आज भिवडी, ता. पुरंदर येथे उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले.
माझ्या रामोशी समाजाच्या अनेक मागण्या आहेत, पण आता छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे उमाजी नाईक यांच्या विचारांचे सरकार राज्यात आहे.#Pune pic.twitter.com/ZLGyl7ejHp— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) September 7, 2022
‘शिवाजी महाराजांनंतर इतिहासात इंग्रजांविरुद्ध प्रथम आवाज उठवणारे राजे उमाजी नाईक होते. ते खरे आद्यक्रांतिकारक नव्या स्वराज्याचे राजे होते. स्वराज्याची ज्योत पेटविण्याचे काम उमाजी नाईक यांनी केले. ब्रिटिशांच्या विरोधात तळागाळातील लोकांकडून उठाव घडवून आणण्यात त्यांचे मोठे योगदान होते. राज्यकारभार करतांना त्यांनी सनद निर्माण केली. त्या सनदीतून प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. ब्रिटिशांना सळो की पळो करणाऱ्या राजे उमाजींना देहदंडाला सामोरे जावे लागले.’ ( Devendra Fadnavis Announcement Raje Umaji Naik Economic Development Corporation )
राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी पुरेसा निधी, रामोशी-बेरड समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ आणि त्यासाठी आवश्यक निधी, भटक्या विमुक्तांना जात प्रमाणपत्रासाठी शासनाचे स्वतंत्र अभियान, एकूणच संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक असेल.https://t.co/ewCnPBi7WT
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) September 7, 2022
महामंडळासाठी 100 कोटी, स्मारकासाठी 5 कोटी देणार
रामोशी आणि इतर भटक्या विमुक्त जातीच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल. त्यासाठी 100 कोटी रुपयांची व राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. रामोशी आणि इतर भटक्या व विमुक्त जाती मधील नागरिकांना यापुढे जातीच्या दाखल्यासाठी अडचणी येणार नाहीत यासाठी जातीच्या दाखल्यासंदर्भातील प्रक्रिया सुलभ करण्यात येईल. या समाजाच्या सर्व समस्या निकाली काढण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. ( Devendra Fadnavis Announcement Of Establishment Raje Umaji Naik Economic Development Corporation for Ramoshi community )
अधिक वाचा –
उद्धव ठाकरेंवर प्रचंड जहरी टीका; “बापाचे नाव नसते तर एखाद्या स्टुडिओमध्ये फोटो..”
‘राजगर्जना’ लवकरच…! मनसैनिकांसाठी गुडन्यूज, राज ठाकरे ‘या’ दिवशी उतरणार मैदानात, वाचा कार्यक्रमपत्रिका