आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात सध्या अनेक चर्चा होताना दिसत आहेत. यात प्रामुख्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) हे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे गट यांच्यासोबत जाणार की नाही, याबद्दल अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. या सर्व चर्चा सुरु असतानाच आता मनसेच्या गोटातून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी माहिती समोर येत आहे.
पक्ष संघटना बळकट करण्यासाठी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) हे मैदानात उतरणार आहेत. यासाठी तब्बल सहा दिवस राज ठाकरे विदर्भात ( Vidarbha ) तळ ठोकणार आहेत. या दौऱ्यात ते नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करून मार्गदर्शन करणार आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 17 सप्टेंबरला मुंबईहून नागपुरला रवाना झाल्यानंतर दिनांक 18 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर इतके दिवस राज ठाकरे विदर्भात तळ ठोकूण असणार आहेत. या कारणास्तव दिनांक 13 सप्टेंबर रोजी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, अविनाश जाधव, आनंद एम्बडवार, बबलू पाटील, मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर हे नेते नागपूर येथे राज यांच्या दौऱ्याचे नियोजन करणार आहेत.
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…"https://t.co/7CdUZLzsR7 #मनसे_सदस्य_नोंदणी pic.twitter.com/WeRehmqc6N
— Raj Thackeray (@RajThackeray) August 27, 2022
राज ठाकरेंच्या दौऱ्याचे संभाव्य वेळापत्रक;
राज ठाकरे दिनांक 18 सप्टेंबर रोजी नागपुरात पोहोचतील. नागपूर ( Nagpur ) येथे 18 आणि 19 सप्टेंबर असे दोन दिवस त्यांचा मुक्काम असेल. त्यानंतर 20 सप्टेंबरला ते नागपूरवरून चंद्रपूर ( Chandrapur ) करिता रवाना होतील. चंद्रपूर येथेही ते मुक्कामी असतील. 21 सप्टेंबरला ते चंद्रपूरवरून अमरावतीसाठी रवाना होतील. २१ आणि 22 सप्टेंबर रोजी ते अमरावती ( Amravati ) येथे थांबून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. त्यानंतर ते 23 सप्टेंबरला अमरावती येथून मुंबईकडे प्रयाण करतील. ( MNS Chief Raj Thackeray Will Visit Vidarbha For 6 Days )
अधिक वाचा –
उद्धव ठाकरेंवर प्रचंड जहरी टीका; “बापाचे नाव नसते तर एखाद्या स्टुडिओमध्ये फोटो..”
मोठी बातमी! राज्यातील तब्बल 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर, वाचा संपूर्ण कार्यक्रम