वेहेरगाव येथील आई एकवीरा आई नवरात्र उत्सव सुरु झाला असता भाविक अर्जुन जाधव (रा. सातारा) हे आपल्या परिवारासह रविवारी (दि. 15 ऑक्टोबर) आई एकवीरा देवीच्या दर्शन घेण्यासाठी कार्ला वेहेरगांव इथे आले होते. दर्शन घेऊन गडावरून खाली येण्यासाठी त्यांनी रिक्षा केली, ती रिक्षा रितेश पडवळ यांची होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
घाई गडबडीत उतरताना भाविकाचा रुपये 18000 हजार किमतीचा मोबाईल हा रिक्षा मध्येच पडला. त्यांना पुणे सोडून पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले कि आपला मोबाईल कुठे तरी पडला आहे. त्यांनी वेहेरगाव येथील नवरात्री उत्सव शुभेच्छा बॅनरवर देवकर, पडवळ, बोत्रे, गायकवाड, देशमुख हि नावे वाचली होती. त्यांनी लगेच त्यांचे मित्र प्रमोद वहिले यांचे मामाचे गाव आहे, हे लक्षात आल्यावर लगेच दुसऱ्या मोबाईल वरुन फोन केला आणि त्यानंतर लगेचच प्रमोद वहिले यांनी त्यांचे मामा सुनिल देवकर यांना फोन लावला.
मोबाईल कोणत्यातरी रिक्षा मध्ये राहीला का, चौकशी केली असता सुनिल देवकर यांनी त्यांच्या सर्व रिक्षाचालक यांना विचारणा केली असता रितेश पडवळ यांनी इमानदारी दाखवत मला एक मोबाईल सापडला आहे. नंतर प्रमोद वहिले यांना फोनवरून माहिती दिली, असता त्यांचा आहे हि खात्री झाल्यावर त्यांचा तो मोबाईल प्रमोद वहिले यांचे भाऊ शैलेश वहिले यांच्याकडे सोमवारी संध्याकाळी रितेश पडवळ, सुनिल देवकर, अजिंक्य पडवळ, नवनाथ गायकवाड , देवकर यांनी मोबाईल जमा केला. तसेच रितेश पडवळ यांना अर्जुन जाधव यांच्या वतीने शैलेश वहिले यांनी इमानदारी दाखवल्या बद्दल बक्षिस देण्यात आले आणि अर्जुन जाधव यांनी त्या सर्वांना फोन करून आभार मानले.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आजपासून ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी! 20 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार
– भिर्रर्र…!! पवनमावळात पारंपारिक पद्धतीने बैलपोळा साजरा; शिवली गावात ‘बैल पकडण्याची स्पर्धा’ उत्साहात संपन्न
– भाजपच्या मतदार नोंदणी अभियानाला चांगला प्रतिसाद; 5700 हून अधिक नवमतदारांची नोंदणी