Dainik Maval News : पवना शिक्षण संकुल, पवनानगर शाळेसाठी कोथरूड (पुणे) येथील सार्थक वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने भौतिक शास्त्र, जीवशास्त्र व गणिताचे मॉडेल असणाऱ्या सात लक्ष रुपयांची अत्याधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात आली. सार्थक फाऊंडेशच्या संस्थापिका स्वाती नामजोशी व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
सार्थक वेल्फेअर फाउंडेशन आणि शाळेचे माजी विद्यार्थी सुभाष मोहोळ यांच्या प्रयत्नातून ही अत्याधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध झाली आहे. कार्यक्रमासाठी सार्थक वेल्फेअर फाउंडेशनचे सिध्देश पुरंदरे, संग्राम मदने, सुभाष मोहोळ, संस्थेचे संचालक महेशभाई शहा, दामोदर शिंदे, सोनबा गोपाळे, सुनिल (नाना) भोंगाडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष काशिनाथ निंबळे, प्रल्हाद कालेकर, नारायण कालेकर, प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे उपस्थित होते.
- यावेळी बोलताना नामजोशी म्हणाल्या की, यापुढील काळात शाळेच्या भौतिक सुविधा वाढविण्यासाठी विविध सी.एस.आर फंड व सार्थक फाऊंडेशन प्रयत्न करणार आहे. यावेळी बोलताना खांडगे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खरी गुणवत्ता असते ती वाढविण्यासाठी सार्थक फाऊंडेशनचे काम कौतुकास्पद आहे
यावेळी सर्व पाहुण्यांनी अत्याधुनिक भौतिकशास्त्र, जीवशास्त्र व गणिताच्या मॉडेलची पाहणी करून माहिती घेतली. सर्व प्रकल्पाविषयी माहिती विज्ञान विभाग प्रमुख वंदना मराठे यांनी पाहुण्यांना दिली. प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ अध्यापक राजकुमार वरघडे व विजय वरघडे यांनी पाठपुरावा करुन ही प्रयोगशाळा मिळवण्यासाठी यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख वंदना मराठे यांनी सूत्रसंचालन भारत काळे यांनी केले तर आभार गणेश ठोंबरे यांनी मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सहारा ग्रुपवर ईडीची कारवाई ; अॅम्बी व्हॅली सिटी येथे 707 एकर जमीन जप्त, बनावट नावांनी खरेदी केली होती जमीन
– वडगाव मावळ येथे सलग बारा तास महावाचन ; शासकीय कर्मचाऱ्यांकडून महापुरुषांना अनोख्या पद्धतीने अभिवादन
– महत्वाची बातमी : शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय
– मोठी बातमी : नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरीच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच