Dainik Maval News : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या 2024-25 या 27 व्या गळीत हंगामातील गव्हाण व मोळी पूजन समारंभ सोमवारी (दि. 11) दुपारी तीन वाजता होणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष विदुरा तथा नानासाहेब नवले यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, प्रत्यक्षात गळीत हंगामास सुरुवात शासनाच्या धोरणाप्रमाणे होईल, असेही त्यांनी सांगितले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सल्लागार शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते आणि श्री क्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे (इनामदार) यांच्या आधिपत्याखाली हा समारंभ होणार आहे.
कारखाना कार्यस्थळावर आयोजित या कार्यक्रमाला कारखान्याचे सभासद, शेतकरी, हितचिंतक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नवले यांनी केले आहे. दरम्यान यंदा संत तुकाराम साखर कारखान्याकडून 5 लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे. मावळ, मुळशी, हवेलीसह पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र कारखान्याचे आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘महायुतीचा उमेदवार असताना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणे म्हणजे राजकीय आत्महत्या’
– आमदार सुनिल शेळके यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल, रात्री दहानंतर प्रचार फेरी काढल्याने गुन्हा । Mla Sunil Shelke
– बापूसाहेब भेगडे यांच्या गाव भेटीत तरुण कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व महिलांचा मोठा प्रतिसाद । Bapu Bhegade