राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) तब्बल सव्वाशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. लोणावळा शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या सामूहिक राजीनाम्या अस्त्राने राजकीय भूकंप झाला असून राष्ट्रवादी पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. मागील 25 वर्षात मावळात पक्षाची कुठेही सत्ता नसताना जे कार्यकर्ते पक्षासोबत होते, तेच कार्यकर्ते आता पक्षाची सत्ता आल्यानंतर नाराज होताना पाहायला मिळत आहे. पक्षात आपल्याला हवा तसा मानपान मिळत नाही, विचारपूस होत नाही, डावलले जाते, असा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
जुन्या जाणत्या आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेमध्ये विश्वासात न घेता डावलले जात असल्याची नाराजी व्यक्त करत लोणावळा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गट यामधील 125 पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते यांनी गुरुवारी (दि. 29 फेब्रुवारी) पक्षीय सदस्यत्व आणि पदांचे राजीनामे दिले आहेत. याबाबतचे लेखी पत्र त्यांनी पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे पाठवले आहे. लोणावळा येथे पत्रकार परिषद घेत, पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. एकाचवेळी 120हून अधिक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या राजीनाम्याने लोणावळ्याच राष्ट्रवादीच उभी फूट पडल्याचे दिसत आहे. ( more than 125 party workers and leaders from ncp ajit pawar group resigned from party in lonavala Maval )
विनोद होगले यांचे पद गेले आणि कार्यकर्ते भडकले –
लोणावळा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विनोद होगले हे संघटनेमध्ये चांगले काम करत असताना व संघटना वाढीसाठी विविध लोकोपयोगी व सामाजिक उपक्रम राबवत असताना अचानक तडकाफडकी त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष तालुक्याच्या आढावा बैठकीमध्ये नियुक्त करण्यात आला. याबाबत होगले यांना कोणतीही कल्पना देण्यात आली नाही, किंवा लोणावळा शहरातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांशी चर्चा देखील करण्यात आली नाही. अजित दादा पवार यांच्यापासून जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष या सर्वांना लोणावळा शहरातील व मावळ तालुक्यातील खदखद माहिती असताना व वारंवार त्यांच्या कानावर सर्व विषय घालण्यात आलेले असताना देखील पक्ष नेतृत्व दखल घेत नसल्याने अखेर नाईलाजास्तव आम्हाला हे पाऊल उचलावे लागले, अशी जाहीर भुमिका राजीनामा देताना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
सदर पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य व पक्ष स्थापनेपासून पक्ष सोबत असणारे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पायगुडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लोणावळा शहर माजी अध्यक्ष विनोद होगले, मावळ तालुका चित्रपट व सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष संतोष कचरे, अनुसूचित जाती जमाती सेलचे मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय गोसावी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गायकवाड, रमेश दळवी, सलीम मण्यार, अजिंक्य कुंटे, सुधिर कदम, कृष्णा साबळे, तुषार पाडाळे, रवी भोईने, शेखर वर्तक, शेखर खिल्लारे, युवती अध्यक्ष अँड. गायत्री रिले, कार्याध्यक्ष नेहा पवार, रत्नप्रभा गायकवाड, गीता खिल्लारे, पुर्वा गायकवाड, निलम घाडगे, प्रतिक्षा कदम, संजय घाडगे, यशवंत दळवी यांच्या सह दुंगार्ली, वलवण, खंडाळा, गावठाण, इंदिरानगर, भांगरवाडी, नांगरगाव, ठोंबरेवाडी, हनुमान टेकडी, हुडको, जुना खंडाळा भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा –
– राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाची मोठी कारवाई! अवैध दारूसह सुमारे 2 कोटी 82 लाखांचा मुद्देमाल जप्त । Pune News
– पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या 9 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना 21 हजार कोटी वितरित । PM Kisan Yojana
– स्वीडनहून थेट मावळात..! शिळींब गावात आले परदेशी पाहुणे, गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात केले स्वागत । Maval News