Dainik Maval News : मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळविलेल्या विद्यार्थी व त्यांचा यशात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना, जागतिक पालक दिनानिमित्त पालकांनाही गौरविण्यात आले.
- न्यू इंग्लिश स्कूल, रमेशकुमार सहानी स्कूल आणि पोतदार स्कूल या शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सोहळ्यामध्ये उपस्थित होते. वडगावमधील १०वी आणि १२वीच्या परीक्षेत ८० हून अधिक टक्के गुण मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना पेन, फुल आणि संपूर्ण कुटुंबीयांना पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टी दर्शनाचे मोफत पास देण्यात आले.
यावेळी प्रा. आयुब पिंजारी आणि चंद्रशेखर जाजू यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक करिअर संदर्भात अचूक मार्गदर्शन केले. सचिन ढोरे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. सत्कार सोहळ्याचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणे हा होता. या सोहळ्यामुळे, करिअर मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात चांगले यश मिळविण्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी व्यक्त केली.
यावेळी मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी सत्कार समारंभप्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे मिसिंग लिंकबाबत नवीन डेडलाइन ! ‘या’ महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
– आनंदाची बातमी ! मावळ तालुक्यातील २४ शाळा बनणार ‘आदर्श शाळा’ ; २० कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर
– वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती