पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीष बापट यांचे बुधवार, 29 मार्च रोजी उपचारादरम्यान वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. गिरीष बापट हे 2019 साली पुणे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर विजयी झाले होते. सध्याच्या लोकसभेचा कालावधी बरोबर एक वर्ष आणि त्याहून काही महिने अधिकचा बाकी आहे. अशा परिस्थितीत गिरीष बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी अर्थात पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार, हे जवळपास निश्चित आहे. ( MP Girish Bapat Passed Away Pune Lok Sabha Constituency By-Election )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
का लागेल पोटनिवडणूक?
गिरीष बापट हे 2019 साली निवडून आले, त्या लोकसभेची मुदत ही 2024 मे महिन्यात संपले. अर्थात सद्याच्या लोकसभेचा एक वर्षाहून अधिकचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे 1951 सालच्या 151A कायद्यानुसार लोकसभेची मुदत संपण्यास एक वर्षाचा कालावधी शिल्लक राहिल्यास निवडणूक घ्यावी लागते. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागेल, हे जवळपास निश्चितच. महत्वाचं म्हणजे हि निवडणूक 6 महिन्यांच्या आत घ्यावी लागणार आहे. तसेच कालावधी कमी असल्यामुळे कदाचित ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जास्त आहे.
अधिक वाचा –
– शिलाटणे गावातील दिवंगत शिवभक्तांच्या कुटुंबीयांची युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली सांत्वनपर भेट
– ‘सोमाटणे फाटा टोलनाक्यावर टोल फीमध्ये कुठलीही दरवाढ करू नका’, खासदार बारणेंचे आयआरबीला पत्र