व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 26, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील झेंडेमळ्यातील रस्त्यासाठी खासदार बारणेंचे संरक्षण मंत्र्यांना साकडे । Maval News

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येत असलेल्या संरक्षण विभागाच्या झेंडे, काळोखे, हगवणे मळा परिसरातील नागरिक रस्त्यांच्या समस्येने त्रस्त आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 25, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
mp shrirang barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येत असलेल्या संरक्षण विभागाच्या झेंडे, काळोखे, हगवणे मळा परिसरातील नागरिक रस्त्यांच्या समस्येने त्रस्त आहेत. या भागात रस्ते करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाने निविदा प्रसिध्द केली आहे. मात्र, संरक्षण विभागाची कामास हरकत आहे. त्यामुळे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी थेट सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन या रस्त्याबाबत साकडे घातले आहे. यावर संपूर्ण माहिती घेऊन सदन कमांडच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची ग्वाही सिंह यांनी दिली.

खासदार बारणे म्हणाले, संरक्षण विभागामुळे स्थानिक नागरिकांचे मोठे क्षेत्रफळ बाधित झाले आहे. संरक्षण विभागाची हद्द असल्याने नागरिकांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील झेंडे, काळोखे, हगवणे मळा येथील एक हजार लोकसंख्या आहे. हे स्थानिक नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. ७५ वर्षांपासून तिथे रहात आहेत. सद्यस्थितीत या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. १९९० मध्ये देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने कच्चा रस्ता तयार केला होता. या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. रस्ता खराब झाल्याने या भागातील विद्यार्थी, नागरिकांना शाळा, वैद्यकीय उपचार, शेतीचे साहित्य आणण्यासाठी देहूरोड जावे लागते. रस्ता अतिशय खराब असल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

  • देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने रस्त्या करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. निविदा काढली आहे. मात्र, हा रस्ता संरक्षण विभागाअंतर्ग येतो. संरक्षण कायद्यानुसार प्रतिबंधित आहे. पूर्वी सैन्य अधिकाऱ्यांनी रस्त्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. परंतु, रस्ता ही मूलभूत गरज आहे. रस्त्याची गरज आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने ३१ मार्च २०२३ रोजी प्रस्ताव मंजूर करून दक्षिणी कमांडला पाठविला होता.

प्रस्तावित रस्त्याची लांबी १८८५ मीटर आणि रुंदी ३.५ मीटर आहे. हा रस्ता संरक्षण विभागाच्या सर्वे नंबर १६३, १६४, १६१ मधून जाणार आहे. त्यामुळे हा रस्ता निर्माण करण्यासाठी मान्यता द्यावी. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड निधी आणि खासदार, आमदारांच्या निधीतून हा रस्ता पूर्ण करेल. त्यावर सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, याबाबतची संपूर्ण माहिती घेतो. त्यानुसार सदन कमांडच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून यूपीएससीच्या धर्तीवर होणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– ‘मावळात पर्यटन व्यवसाय वेगाने विकसित होतोय, स्थानिक तरूणांनी शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक प्रगती साधावी’
– जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांना 2028 पर्यंत मुदतवाढ – पाणीपुरवठा मंत्री


Previous Post

वन्यप्राण्यांसाठी पाणवठे, वणवे रोखण्यासाठी जनजागृती ; उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाकडून उपाययोजना

Next Post

‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Receiving Jagadguru Sant Shri Tukaram Maharaj award is greatest joy for me DCM Eknath Shinde

‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

com maharashtra devendra fadanvis

राज्यातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! वीजेच्या दरात होणार मोठी कपात ; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

June 26, 2025
Fake UPI payment

Lonavala : गर्दीचा फायदा घेत दुकानदारांची फसवणूक, लोणावळ्यात खोट्या यूपीआय पेमेंटचा पर्दाफाश, पोलिसांचे आवाहन…

June 26, 2025
Road work from Panchayat Samiti Chowk to Mahadji Shinde Udyan in Vadgaon Maval stalled

…अन्यथा साठलेल्या पाण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना होडी-होडी खेळायला लावू – मनसे

June 26, 2025
Villagers protest against Vadgaon Nagar Panchayat by performing abhishek at Mahadev temple

वडगाव नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभाराचा श्री महादेव मंदिरात दुग्धाभिषेक करून ग्रामस्थांकडून निषेध । Vadgaon Maval

June 26, 2025
ancient-shivling-found-on-hill-in-kamshet-maval-limits

कामशेत शहर हद्दीतील टेकडीवर सापडले पुरातन शिवलिंग ; ग्रामस्थांसह शिवभक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण । Kamshet News

June 26, 2025
Crime

नायगाव येथील टोनी दा ढाब्यावरील हाणामारीप्रकरणी सात जणांना 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी । Maval Crime

June 25, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.