व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वन्यप्राण्यांसाठी पाणवठे, वणवे रोखण्यासाठी जनजागृती ; उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाकडून उपाययोजना

उन्हाळा हा जसा मनुष्यासाठी त्रासदायक, तसाच मुकजीवांसाठीही तो तितकाच कठीण काळ असतो.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 25, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Supply of water through tankers

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : उन्हाळा हा जसा मनुष्यासाठी त्रासदायक, तसाच मुकजीवांसाठीही तो तितकाच कठीण काळ असतो. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने मावळ तालुक्यातील डोंगर भागात सध्या वणवे लागण्याची शक्‍यता वाढली आहे. तसेच, पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने नैसर्गिक पाणवठे, ओढे, ओहोळ सुकू लागले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच वन्यप्राण्यांना देखील पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू शकते. या सर्व पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात वनविभागाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

मावळ तालुक्‍यात वडगाव व शिरोता असे दोन वन विभाग आहेत. दोन्ही विभागात मिळून सुमारे तीस हजार हेक्‍टर वन व खासगी वन क्षेत्र आहे. वन क्षेत्रात विविध प्रकारचे वन्य पशू पक्षी आढळून येतात. उन्हाळ्यात वनक्षेत्रात वणवे लागण्याच्या घटना घडत असून त्यातून वन्य प्राण्यांना धोका निर्माण होतो. यासह उन्हाळ्यात पाण्याचे नैसर्गिक पाणीसाठे आटतात, त्यामुळे वन्यप्राणी अन्न व पाण्यासाठी मानवी वस्तीकडे येण्याची शक्‍यता वाढते. यामुळे वनविभागाने काही खास उपाययोजना केल्या आहेत.

  • मावळ तालुक्यात पवना, वडीवळे, आंद्रा, वलवण, शिरोता, सोमवडी, ठोकळवाडी, जाधववाडी, मळवंडी ठुळे इत्यादी धरणे आहेत. या धरणांमधून वन्य प्राण्यांना बारमाही पाणी उपलब्ध असते. यासह शिरोता वनविभागात ४२, तर वडगाव वनविभागात सुमारे ३५ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. वनविभागाचे कर्मचारी वेळोवेळी टँकरद्वारे हे पाणवठे भरतात व त्यांच्यातील गाळ काढून ते स्वच्छ ठेवतात.

वनक्षेत्रात लागणारे बहुतांश वणवे हे मानवनिर्मित असतात. धुम्रपान करणारे नागरिकांकडून अनेकदा असे अपघात घडतात. यासह शेतीत राब जाळताना अनकेदा आग पसरून वणवे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यापार्श्वभूमीवर वनविभागाने वणवे रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत. यात गावोगावी नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली आहे. तसेच, आपदा मित्रांचे व्हॉट्सअप ग्रुप बनवून वणवे रोखणे अथवा विझविणे यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. तसेच, वणवे रोखण्यासाठीच्या कीट देण्यात आले आहेत.

मावळात अनेक ठिकाणी वनक्षेत्राला लागून शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. उन्हाळ्यात भातशेतीमध्ये राब जाळताना अनेकदा आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांनी राब जाळताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांनी केले आहे. तर, मावळात पर्यटकांची संख्या वाढली आहे. काही पर्यटकांमुळे यापूर्वी आगीच्या घटना घडल्या आहेत. पर्यटकांनी स्वयंशिस्त पाळावी व वनक्षेत्रातून जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांनी केले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून यूपीएससीच्या धर्तीवर होणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– ‘मावळात पर्यटन व्यवसाय वेगाने विकसित होतोय, स्थानिक तरूणांनी शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक प्रगती साधावी’
– जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांना 2028 पर्यंत मुदतवाढ – पाणीपुरवठा मंत्री


Previous Post

उन्हाची तीव्रता वाढली, ऊसतोड कामगारांच्या मुलांचे हाल, सावलीसाठी घ्यावा लागतोय झाडांचा आधार

Next Post

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील झेंडेमळ्यातील रस्त्यासाठी खासदार बारणेंचे संरक्षण मंत्र्यांना साकडे । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
mp shrirang barne

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील झेंडेमळ्यातील रस्त्यासाठी खासदार बारणेंचे संरक्षण मंत्र्यांना साकडे । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jishnu Dev Verma takes oath as 22nd Governor of Maharashtra Know about new Governor

महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल

March 10, 2026
Auto-Rickshaw

मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती

March 10, 2026
LPG-Gas

ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू

March 10, 2026
Sunita Yewle elected as Maval Panchayat Samiti Chairperson Sahebrao Karke as Deputy Chairperson unopposed

मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड

March 10, 2026
Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.