Dainik Maval News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२५ आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२५ या २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार होती, मात्र नगर परिषद निवडणुकांच्या मतमोजणीसाठी परीक्षा केंद्र व मतमोजणीचे ठिकाण यातील कमी अंतर,कर्मचाऱ्यांची कमतरता, वाहतूक कोंडी व इतर महत्त्वाच्या कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला आहे, असे आयोगाने कळवले आहे.
परीक्षांचे सुधारित दिनांक
गट-ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ ही परीक्षा ४ जानेवारी २०२६ आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ ही परीक्षा ११ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन आयोगाने केले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…
– विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; नागपूर खंडपीठाचा आदेश, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
