व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमध्ये आलेल्या मल्टिनॅशनल कंपन्यांची दलालांकडून कोट्यवधींची फसवणूक ; आमदार सुनील शेळके यांचे गंभीर आरोप

“मावळ तालुक्यात येणाऱ्या उद्योगांशी फसवणूक करणाऱ्या दलालांना आम्ही सुट्टी देणार नाही,” असा कठोर इशारा आमदार सुनील शेळके यांनी दिला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 9, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात गुंतवणुकीसाठी येणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्यांची काही दलालांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. हुंदाईसारखी कोरियन कंपनी महाराष्ट्रात आणणाऱ्या महायुती सरकारचा उद्देश रोजगारनिर्मिती असताना, काही दलालांनी कंपनीच्या व्हेंडरना बेकायदेशीर व फसवे दस्तऐवज दाखवून मिळकतीची विक्री करून आंतरराष्ट्रीय कंपनीलाच आर्थिक गंडा घातला, असे आमदार शेळके यांनी नागपूर येथे स्पष्ट केले.

Novel NIBR Ads

फसवणुकीत सामील दलालांनी खोट्या मोजणी नकाशावर बांधकाम परवानगी घेतल्याचे, कोणताही पूर्णत्वाचा दाखला (OC) न घेता प्रकल्पांची विक्री केल्याचे, शिवाय वनीकरण झोनमध्ये बेकायदेशीर बांधकाम करून हजारो ब्रास उत्खननही केल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे अनेक कंपन्यांची फसवणूक झाल्याने, संबंधित दलालांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी शेळके यांनी मांडली.

मावळातील एमआयडीसी परिसरात वाढत्या गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या कंपन्या येथे व्यवसाय उभारण्यास इच्छुक आहेत; मात्र काही दलाल बनावट झोन दाखले, नकाशे बदलणे, चुकीची परवानगी दाखवणे, आणि गुंतवणूकदारांना दिशाभूल करून मिळकतीची विक्री करीत असल्याचे शेळके यांनी निदर्शनास आणले. “मी मागील सहा वर्षांत माझ्या मतदारसंघातील उद्योगांच्या ठाम पाठीशी उभा राहिलो आहे,” असेही शेळकेंनी सांगितले.

“मावळ तालुक्यात येणाऱ्या उद्योगांशी फसवणूक करणाऱ्या दलालांना आम्ही सुट्टी देणार नाही,” असा कठोर इशारा देत आमदार शेळके यांनी या सर्वांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

याचदरम्यान, या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रकरणाची संपूर्ण माहिती सादर केली. मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तत्काळ कारवाईचे संकेत दिल्याचे समजते. या भेटीमुळे संपूर्ण प्रकरणाला आता राज्य सरकारकडून गती मिळणार असल्याची चर्चा राजकीय व औद्योगिक क्षेत्रात सुरू आहे.

Novel NIBR Ads

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…
– विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; नागपूर खंडपीठाचा आदेश, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण


dainik maval jahirat

Previous Post

महत्वाची बातमी ! नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीमुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली

Next Post

नगराध्यक्षाचं जनता ठरवेल, पण उपनगराध्यक्षाचं बोला ! उमेदवारांकडून उपनगराध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावायला सुरूवात

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
people will decide mayor but what about deputy mayor Candidates started fielding for deputy mayor post

नगराध्यक्षाचं जनता ठरवेल, पण उपनगराध्यक्षाचं बोला ! उमेदवारांकडून उपनगराध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावायला सुरूवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chief Minister Devendra Fadnavis

बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 19, 2026
crime-arrested

Lonavala Crime : लोणावळ्यात १ लाख ९३ हजारांचे मेफेड्रॉन जप्त ; एमडी विक्रीसाठी आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल

June 19, 2026
maharashtra-police

महत्वाची बातमी ! पुणे जिल्ह्यात ७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 19, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

Lohagad Fort Accident : सेल्फीच्या नादात नवरदेवाने गमावले प्राण ; लोहगड किल्ल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

June 19, 2026
mp-shrirang-barne

वीज समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश

June 19, 2026
Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.