महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तुषार विठ्ठल वाघ हे खुल्या व मागासवर्गवारीतू राज्यातून प्रथम आले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सायली सातप्पा फासके ह्या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत. उमेदवारांच्या माहितीसाठी निकाल व प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ( MPSC Maharashtra Agricultural Service Main Examination final result announced )
अंतिम निकालात अर्हताप्राप्त, शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.
जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2022 ची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://t.co/MzqludbEkjhttps://t.co/LmzfCZNlyI
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) May 9, 2024
अधिक वाचा –
– मावळ लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कामशेत पोलिसांकडून शहरात शक्ती प्रदर्शन ! Kamshet News
– ‘मी मॅच फिक्सिंग करत नाही…’ संजोग वाघेरेंसोबत ‘तेव्हा’ नेमकं काय झालं? अजितदादांनी सर्वांसमोर स्पष्ट केलं, वाचा… । Maval Lok Sabha
– मतदान करताना फोटो किंवा व्हिडिओ काढल्यास होणार कारवाई ! मतदारांनी थिल्लरपणा टाळून मतदान करण्याचे आवाहन