आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील 50 शाळांना बुधवारी (दिनांक 5 जुलै) मल्टीफंक्शनल प्रिंटरचे वाटप करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित आदर्श विद्यामंदिर तळेगाव दाभाडे, पुणे येथे बुधवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर म्हणाले, “आपल्या मराठी माध्यमांच्या शाळा दूरवर खेडोपाडी आहेत. बऱ्याचवेळा या शाळेतील शिक्षकांना प्रशासकीय कामासाठी गावापासून दूरवर जावे लागते. अशावेळी हा प्रिंटर उपयोगी पडणार असून झेरॉक्स, प्रिंटिंग आणि स्कॅनिंग अशा सुविधांनी तो परिपूर्ण असणार आहे. या प्रिंटरचा शिक्षक बांधवांनी पुरेपूर वापर करावा, जेणेकरून तो खराब झाल्यानंतर तुम्ही पुन्हा माझ्याकडे मागणी कराल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ( multi function printers to 50 schools in Maval taluka from MLA Jayant Asgaonkar )
“आज शिक्षण क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक टप्प्यावर चांगली माणसे भेटत गेली, त्यामुळे मला काम करण्यासाठी बळ मिळाले. माझ्या मतदारसंघातील सर्वच शाळांना शैक्षणिक साहित्य पुरवणे हाच माझा उद्देश आहे”, असे मतही आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितले.
यावेळी मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे सचिव यादवेंद्र खळदे, सहसचिव वसंत पवार, खजिनदार नंदकुमार शेलार, संचालक प्राचार्य दत्तात्रय बाळसराफ, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे, मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा सभापती बबनराव भेगडे, स्नेहल बाळसराफ, संस्थाचालक संघटनेचे अजित वडगावकर, महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनेचे प्रवक्ते शिवाजी खांडेकर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचे प्रवक्ते दादासाहेब गवारे, के. पी. पाटील, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड, भगवान शिंदे, पिंपरी चिंचवड माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष योगेश भोसले, विठ्ठल माळशिकारे, संजय गायकवाड, प्रकाशराव शिंदे, इथापे सर, शिवाजीराव टाकवे यांच्यासह मावळ तालुक्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुलें’ : मावळच्या भावी खासदार… माधवी जोशी यांच्याकडून पुन्हा एकदा माणूसकीचे दर्शन
– काळीज चिरणारी बातमी! चौथ्या मजल्यावरुन कोसळल्याने 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, वडगावातील दुर्दैवी घटना