महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडण्यासाठी जुना मुंबई पुणे हायवे आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्ग हे सध्या अस्तित्वात आहेत. परंतू हे दोन पर्यायी मार्ग असूनही ह्या मार्गांवर होणारी वाहतूक कोंडीची समस्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. विकेंड, सुट्ट्या, सण समारंभ या काळात हे महामार्ग कित्येक किलोमीटरपर्यंत पॅक असतात. यातूनच प्रवाशांची सुटका व्हावी, यासाठी रस्ते विकास महामंडळाने एक नवा निर्णय घेतला आहे. सध्या अस्तित्वात असलेला मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग लवकरच आठपदरी करण्याचा प्रस्ताव महामंडळाकडून राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. ( Mumbai Pune expressway will soon be eight-lane MSRDC proposal to government )
पुणे ते मुंबई दरम्यान प्रवास करणार्या प्रवाशांची आणि पर्यायाने रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची संख्या खूपच जास्त आहे. याशिवाय लोणावळा, खंडाळा, खोपोली, कार्ला यासह अन्य पर्यटनस्थळे पाहण्यासाठी दररोज प्रवासी वाहतूक सुरु असते. त्यामुळे दिवसातील काहीकाळ आणि आठवड्याची अखेरीस या महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे सध्या सहापदरी असलेले मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा दोन मार्गिका वाढवून एकूण आठपदरी करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारला सादर केला आहे. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर पुढील तीन वर्षांत रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याचा मानस महामंडळाचा आहे.
द्रुतगती मार्ग आठ पदरी झाल्यास होणारे फायदे –
- वाहतूक कोंडीची समस्या थेट कमी होऊ शकेल
- अपघातांचे प्रमाण कमी होणार
- वाहतूक आणि दळणवळण वाढल्यास आर्थिक समृद्धी होऊ शकते
- मुंबई, पुण्यासह सातारा, कोल्हापूर, कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– लोणावळा इथे ‘राज्य उत्पन्न आणि संबंधित आकडेवारी’ विषयावर पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन । Pune News
– कामशेत – वडगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि सार्वजनिक गणेश मंडळे, पोलिस पाटील यांच्यात नियोजन बैठक संपन्न
– शिवजन्मभूमीचा डंका जगभरात वाजणार! शिवछत्रपतींचा जगातील सर्वात मोठा पुतळा जुन्नरमध्ये उभारला जाणार