वंदे भारत एक्सप्रेसचे लोणावळा रेल्वे स्टेशन येथे भारतीय जनता पार्टी मावळ तालुका यांच्यावतीने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. ढोल ताशांच्या गजरात एक्सप्रेसचे स्वागत करण्यात आले.
रेल्वे मंत्रालयाद्वारे मुंबई ते नाशिक आणि मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानंतर शुक्रवारी (10 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लोणावळा येथे वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत केले. ( Mumbai Solapur Vande Bharat Express Grand Welcomed At Lonavla Railway Stations )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्याने मुंबई ते पुणे दोन्ही शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना हे अंतर सद्यस्थितीपेक्षा निम्म्या वेळेत पार करता येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस सुरु केल्याबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्रीगटाचे प्रमुख अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री अश्विनजी वैष्णव , रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे यावेळी आभार मानण्यात आले.
अधिक वाचा –
– मावळ भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न, बाळासाहेब पाटलांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या दौऱ्याचे नियोजन
– वंदे भारत एक्सप्रेसचे मावळ तालुक्यात जल्लोषात स्वागत – व्हिडिओ