महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरु आहे. या अधिवेशनात मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी तालुक्यातील अनेक समस्या, प्रश्न शासन दरबारी मांडले. त्यानंतर आज, बुधवार (दि. 13 डिसेंबर) रोजी मावळ तालुक्यातील जनतेला मोठे गिफ्ट मिळणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. याला आमदार सुनिल शेळके यांच्या कार्यालयाकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महत्वाची बाब म्हणजे अधिवेशनात यापूर्वीच मावळ तालुक्यातील विविध विकासकामांसाठी तब्बल 400 हून अधिक कोटींचा निधी मावळ तालुक्याला मिळाला आहे. परंतू मावळ तालुक्यातील काही अन्य महत्वाचे प्रश्न पाहता, त्यांचीही सोडवणूक याच अधिवेशनात होण्याची आशा आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा असून आज मावळच्या जनतेला काही मोठे गिफ्ट मिळणार, मावळ तालुक्यासाठी काही मोठी घोषणा होणार अशी चर्चा होता आहे. आता ती घोषणा किंवा गिफ्ट नेमके काय असणार, हे लवकरच समजेल. परंतू, याबद्दल अनेक चर्चा होत आहेत. ( Nagpur Winter Session Big News For Maval Taluka MLA Sunil Shelke )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात? नागपूरमध्ये मोठा राडा – पाहा Live व्हिडिओ
– ‘मावळचा जलनायक’ रिल्सचा प्रथम क्रमांक! आदित्यराजे मराठे ठरला ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय रिल्स स्टार’ । Sunil Shelke Birthday
– ‘पाणी योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करा; जनरल मोटर्स कामगारांना न्याय द्या’ : आमदार सुनिल शेळकेंची अधिवेशनात मागणी