Dainik Maval News : महंत नामदेव महाराज शास्त्री यांची श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील कीर्तन सेवा रद्द केल्याचे श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा शाखेने आक्षेप घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला.
- बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंबंधित असलेल्या आरोपींच्या समर्थनार्थ बाजू घेतल्याने नामदेव महाराज शास्त्री यांचे भंडारा डोंगरावरील शुक्रवार, दिनांक 7 फेब्रुवारी रोजी होणारी कीर्तनसेवा रद्द करावी अशी लेखी मागणी ट्रस्टकडे केल्याने ट्रस्टने विचार करून हे कीर्तन रद्द झाल्याचे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा शाखेच्या वतीने हे निवेदन देण्यात आले होते. निवेदनात अनिकेत देशमाने, युवराज सुरवसे, मनोज खांदवे, सुधीर मते, समीर पायगुडे, निखिल मु-हे, रमेश पाटील, रामदास खांदवे, नरेंद्र मु-हे व्यंकटेश देशमुख, हर्षवर्धन कदम आदींच्या सह्या आहेत.
संघटनेच्या वतीने हे निवेदन तळेगाव पोलीस स्टेशनलाही देण्यात आले होते. तसेच तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनकडूनही भंडारा डोंगर ट्रस्टला कळविले होते. त्यानंतर भंडारा डोंगर ट्रस्टने किर्तन सेवा रद्द केल्याचे समजते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल
– बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link