Dainik Maval News : विकासाची दृष्टी आणि विकासकामांची पावती या जोरावर आशाताई बाबुरावआप्पा वायकर या कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गटात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. भारतीय जनता पार्टी पक्षाच्या अधिकृत उमेदवार असलेल्या आशाताई वायकर यांनी यापूर्वीही कार्ला-खडकाळा गटात घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या, तदनंतर आता पुन्हा एकदा पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्या मतदारांच्या भेटीस जात असताना सगळीकडे त्यांच्यात नावाची चर्चा होताना दिसत आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबुरावआप्पा वायकर यांनी त्यांच्या कार्यकाळात मावळ तालुक्यात केलेली विकासकामे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आशाताई वायकर याही समाजकारणात अग्रेसर आहेत. केवळ निवडणुकपुरती आश्वासने न देता प्रत्यक्षात कृतीतून विकासकामे मार्गी लावण्याचे धोरण आशाताई वायकर यांच्याकडे असून तेच धोरण घेऊन आशाताई वायकर या मतदारांपर्यंत पोहचत आहे.
कुठल्याही अपप्रचार आणि खोट्या भूलथापांना बळी न पडता मतदार विकासासाठी मला मतदान करतील आणि कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गटात देशाचे पंतप्रधान, विकासपुरूष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे आदर्श नेतृत्व, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारातील उमेदवार म्हणून मला मत देताना या गटात कमळ फुलेल, असा विश्वास आशाताई बाबुरावआप्पा वायकर यांनी दैनिक मावळसोबत बोलताना व्यक्त केला.
मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण पाच गट असून त्यापैकी कार्ला-खडकाळा हा प्रमुख गट आहे. या गटात महिला सर्वसाधारण असे आरक्षण असून येथे भारतीय जनता पार्टीकडून आशाताई वायकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दीपाली हुलावळे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथील लढत ही अत्यंत हायप्रोफाईल लढत होणार असल्याची चर्चा मावळ तालुक्यात असून यामुळे या गटात प्रचारही जोरात होताना दिसत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– ‘…त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलंच नाही’ ; मावळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमने – सामने
– निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर ; जागोजागी होतेय वाहनांची तपासणी
– राष्ट्रवादीकडे युतीसाठी कुठलाही प्रस्ताव नाही अन् मावळात राष्ट्रवादीसोबत युती नाही ! – बाळा भेगडे यांच्याकडून युतीला फुलस्टॉप
– इंदुरी – वराळे जिल्हा परिषद गटात राजकीय भूकंप ; प्रशांत भागवत, मेघा भागवत यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम