Baramati Lok Sabha Supriya Sule VS Sunetra Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी शनिवारी (दि. 30) पत्रकार परिषदेत केली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
महायुतीच्या माध्यमातून या अगोदरच रायगड मतदारसंघातून सुनिल तटकरे तर शिरुर मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील या दोन उमेदवारांची अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती. आणि शनिवारी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातील परभणी मतदारसंघात रासपचे महादेव जानकर यांची उमेदवारी तर त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा अजित पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली. ( Nanand Vs Bhavjay Baramati Lok Sabha Candidature Announced Supriya Sule Vs Sunetra Pawar )
बारामती लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेंच्या नावाची अगोदरच घोषणा झाली होती. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी प्रचारालाही सुरुवात केली होती. शरद पवार यांनीही त्याच अनुषंगाने विविध नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्या. तर पवार कुटुंबीयही या निवडणुकीत मैदानात उतरले. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. अखेर, या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून बारामतीमधून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी घेतले स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन; चिंचवडमधून प्रचाराला सुरुवात
– समर्थ शलाका स्पर्धा परीक्षेत श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेतील आर्या अहिरे प्रथम । Talegaon Dabhade
– ‘तुम्ही निवडून यालच..आपल्याला हा गड राखायचाय’, उद्धव ठाकरे यांच्याकडून संजोग वाघेरेंना प्रचार सुरु करण्याचे आदेश