Dainik Maval News : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ मंगळवारी (दि.1 एप्रिल) रोजी वडगाव मावळ येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली.
मंगळवारी सकाळी दहा वाजता वडगाव येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात हा मेळावा होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल आमदार सुनील शेळके यांचा तसेच श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, सर्व सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, महिलाध्यक्ष दीपाली गराडे व युवक अध्यक्ष किशोर सातकर यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील 560 गोशाळांच्या बँक खात्यात 25 कोटी 44 लाखांचे अनुदान जमा ; तुमची गोशाळा असल्यास ‘असा’ मिळवा योजनेचा लाभ
– दिलासादायक ! राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 555 कोटींची विमा नुकसान भरपाई
– राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणार – मंत्री आदिती तटकरे
– तळेगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल ; श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय । Talegaon Dabhade