Dainik Maval News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षानेही आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते ठिकठिकाणी जाऊन कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेऊन पक्ष संघटनाचा आढावा घेत मार्गदर्शन करीत आहेत. पक्षातील प्रमुख नेते युगेंद्र पवार यांनी नुकतीच आंबेगाव विधानसभा मतदारसंघात बैठक घेतली. त्यानंतर आता ते मावळ विधानसभा मतदारसंघात शनिवारी (दि. २७ सप्टेंबर) आढावा बैठक घेणार आहेत.
वडगाव मावळ येथे शनिवारी दुपारी अडीच वाजता होणाऱ्या या बैठकीसाठी पुणे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, माजी मंत्री मदन बाफना, महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, युवक पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष, पुणे आणि मावळ तालुक्याचे प्रभारी अतुल राऊत, मावळचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, महिलाध्यक्ष रत्नमाला करंडे, युवक तालुकाध्यक्ष विशाल वहिले, माजी जिल्हा परिषद सदस्य किसनराव कदम, विद्यार्थी अध्यक्ष अक्षय मुऱ्हे, संपर्कप्रमुख विजय शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.
दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके हे अजित पवार यांच्या सोबत राहिले. त्यानंतर माजी मंत्री मदन बाफना यांच्यासारख्या जुन्या जाणकार मंडळींनी शरद पवार यांच्या सोबत थांबण्याचा निर्णय घेतला. नव्या जुन्या कार्यकर्त्यांची बांधणी करून पक्ष पुन्हा आपली वाटचाल करत आहे.
पक्षाच्या संघटनात्मक कामांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेतली जात असून यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, असे पक्षाचे युवक आघाडीचे तालिका अध्यक्ष विशाल वहिले यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– शिवसेनेचे माजी आमदार, मावळमधील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन
– व्हिडिओ : कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग : प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिकांचा विरोध, प्रकल्पाबाबत संभ्रम