नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. आमदार सुनिल शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. आमदार शेळकेंनी विज्ञान प्रदर्शन, कला प्रदर्शन आणि रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करुन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत उपक्रमांची माहिती जाणून घेतली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘विद्यालयाने अशा प्रदर्शनाच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचा नक्कीच फायदा होत असतो.’ असे मत यावेळी सुनिल शेळकेंनी व्यक्त केले. ( Naveen Samarth Vidyalaya and Junior College Talegaon Dabhade Annual Prize Distribution Ceremony )
या कार्यक्रम प्रसंगी आमदार शेळके, ज्येष्ठ नेते भास्कर म्हाळसकर, संतोष खांडगे, प्रमुख वक्त्या डॉ. संज्योत वैद्य, महेशभाई शहा, राजेश म्हस्के, सोनबा गोपाळे, दामोदर शिंदे, दादासाहेब उऱ्हे, डॉ. शाळिग्राम भंडारी, अनिकेत काळोखे, प्राचार्या सौ. वासंती काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पवना शिक्षण संकुलामध्ये यु.पी.एल. कंपनीच्या 50 लाख निधीतून बांधण्यात आलेल्या अद्ययावत स्वच्छतागृहाचे लोकार्पण
– ‘देहूतील सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत झाल्या पाहिजेत’, प्रशासनाने कारवाई न केल्यास मनसेकडून ‘खळ्ळ-खट्याक’चा इशारा
– मोठी बातमी! जम्मू काश्मीरमधील राजौरीत लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, 4 जवान शहीद