मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) मुंढावरे गावचे ( Mundhavare Village ) विद्यमान सरपंच नवनाथ हेलम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे विद्यमान आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास ठेवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ( navnath helam sarpanch of mundhavare maval join ncp party )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आमदार शेळकेंनी त्यांचे राष्ट्रवादीत मनःपूर्वक स्वागत करुन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी एस.आर.पी.चे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशभाऊ साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, माजी कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, अमोल केदारी, रोहिदास वाघमारे, संतोष राऊत, शिळींब गावचे माजी सरपंच संभाजी शिंदे, दिपक घोगरे, तुकाराम पाठारे, संदीप पाठारे, राणू खराडे, लीलाधर धनवे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– लोणावळ्यात राहुल गांधींविरोधात भाजपाचे आंदोलन, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यालाही अभिषेक
– खळबळजनक! तळेगाव दाभाडेतील आरोपी संजय कार्लेचा मुंबई-गोवा महामार्गावर खून, बंद गाडीत आढळला मृतदेह