“वडगाव मावळ शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार विचारात घेऊन शहरातील विकासकामांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध होईल या हेतूने भाजपा पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून सन 2018 साली वडगाव ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाले. भाजपा आणि राष्ट्रवादी तसेच भाजपा आणि अपक्ष अशी तिरंगी लढत होऊन, तरुण होतकरू चेहरा पाहून पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत वडगावकरांनी सर्वाधिक मते मयूर ढोरे यांच्या पारड्यात टाकून त्यांना नगराध्यक्षपदी विराजमान केले. परंतू मागील साडेचार वर्षांत नगराध्यक्ष यांनी राज्यातील बदलत्या राजकीय परीस्थितीनुसार वेळोवेळी रंग बदलून नगरपंचायतीत मनमानी कारभाराला प्राधान्य दिले आणि वडगावकर नागरिकांचा सपशेल अपेक्षाभंग केला आहे,” असा घणाघात वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे यांनी केला आहे. ( Politics Between BJP And NCP On Vadgaon Maval City Water Supply Scheme )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“वडगाव शहरातील विकासकामे मार्गी लावण्याबाबत मविआ सरकार काळात आलेले अपयश झाकण्यासाठी आता भाजपा-शिवसेना युती सरकारने मंजुरी दिलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न वडगावचे नगराध्यक्ष आणि तालुक्याचे आमदार दोघांकडून केला जात आहे. परंतू विकासकामे केल्याचा कितीही आव आणला तरी वडगावकर जनता सुज्ञ आहे. पुढील सहा-सात महिन्यांतच नगरपंचायत निवडणुकीच्या निकालातून याची प्रचिती येईल. सर्वसामान्य जनतेला वेड्यात काढून फसवण्याचे धंदे नगराध्यक्ष आणि आमदार यांनी बंद करावेत,” असा टोलाही भाजपा शहराध्यक्ष कुडेंनी लगावला आहे.
“वडगाव नगरपंचायतीसाठी 40 कोटींची पाणी योजना माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतूनच मंजूर झाली आहे, हे आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करू”, असे गटनेते दिनेश ढोरे सांगितले.
हेही वाचा – वडगाव शहरातील ‘या’ भागाला मिळाली नवी ओळख, पाहा जागेचे नवीन नामकरण काय? I Vadgaon Maval
“वडगावमधील विकासासाठी भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे तसेच सर्व नगरसेवक यांनी माजी मंत्री बाळा भेगडे यांची संयुक्त बैठक झाल्यानंतर बाळा भेगडे यांनी स्वतः पाठपुरावा करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिनांक 2 नोव्हेंबर 2022 रोजी भेट घेऊन तालुक्यातील विविध विकास कामांची मागणी केली होती. यामधील वडगाव शहरातील पाणी योजनेसाठी 40 कोटी निधीची मागणी केली असता, वडगाव शहरातील पाणी योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. लवकर त्या कामाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करणार आहे”, अशी माहिती अनंता कुडे यांनी दिली.
हेही वाचा – तुमच्याकडेही भाडेकरू आहेत का? 7 दिवसांत लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे माहिती सादर करा, अन्यथा…
तसेच, “जांभूळ येथे इंद्रायणी नदीवर 15 जवळ जॅकवॉल बांधून हे पाणी लिफ्ट करून 300 मीमी व 2– मीमी व्यासाच्या पाईपलाईन मधून हे पाणी वडगाव नजीकच्या शिंदे टेकडी व संस्कृती येथे फिल्टर प्लांट बसून शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणारा ही ड्रीम प्लॅनिंग योजना आहे. या पाणी योजनेच्या माध्यमातून वडगाव शहरातील नागरिकांची पाण्याची होणारी गैरसोय कायमस्वरूपी मिटणार आहे”, अशी माहिती विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर यांनी दिली.
अधिक वाचा –
– लोणावळ्यात राहुल गांधींविरोधात भाजपाचे आंदोलन, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यालाही अभिषेक
– मुंढावरे गावचे विद्यमान सरपंच नवनाथ हेलम यांचा आमदार शेळकेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश