राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आणि आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ‘संकल्प दूरदृष्टीचा – सर्वांगीण विकासाचा’ ‘गावनिहाय संवाद दौरा टप्पा क्रमांक-2 ला सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी कांब्रे ना. मा. येथील गावभेटीत कांब्रे, करंजगाव, गोवित्री, उकसान, पाले, वळवंती, वडवलीतील कार्यकर्ते आणि नागरिक यांची भेट झाली. भाजगाव इथे कोळवाडी, भाजगाव, शिरदे, सोमवडी, थोरण, जांभवली, उंबरवाडी येथील कार्यकर्ते आणि नागरिक यांची भेट झाली. सांगिसे इथे वाडिवळे, वळक, बुधवडी, सांगिसे, वेल्हवळी, नेसावे, खांडशी, मुंढावरे येथील कार्यकर्ते आणि नागरिक यांची भेट झाली. ( NCP Maval Taluka village wise dialogue tour Started )
गावनिहाय संवाद दौऱ्यातील भेटी दरम्यान गावागावातील कार्यकर्त्यांनी गावातील विकास कामे आणि स्थानिक समस्या याचा ऊहापोह केला. प्रलंबित प्रश्न मांडले स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांचा पक्षाने दुवा ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार सुनिल शेळके यांच्या विकासभिभुख कामांबाबत समाधान व्यक्त केले. या दौऱ्यात मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
अधिक वाचा –
– कल्हाट गावचे सुपुत्र, मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष रामदास करवंदे यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
– अवैधरित्या गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर शिरगाव पोलिसांचा छापा, लाखो रुपयांचे रसायन जप्त
– द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक! वीकएंड आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहन चालकांना जाहीर आवाहन, वाचा सविस्तर