Dainik Maval News : मावळ तालुक्यात होत असलेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मावळच्या निवडणुकीसाठी आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरूवात झालेली आहे. निवडणुकीतील लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार प्रचारात सक्रीय झाले आहेत. गुरुवारी (दि. २२) आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत नवलाख उंबरे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इंदुरी-वराळे गटातील जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार पल्लवी संदीप दाभाडे आणि वराळे पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र गुलाबराव कडलक यांच्या प्रचाराचा आरंभ करण्यात आला. याप्रसंगी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
वराळे गणातील आणि एकूणच इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटातील महत्वाचे गाव असलेल्या नवलाख उंबरे गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन उमेदवार पल्लवी दाभाडे, राजेंद्र कडलक यांच्या सहीत आमदार सुनील शेळके, पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे आणि अन्य मान्यवरांनी हजारो नागरिक बंधू भगिनींच्या उपस्थिती प्रचाराचा नारळ फोडला.

याप्रसंगी उपस्थितीत नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून गावात आणि परिसरात झालेली विकासकामे लक्षात घेत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीत या गटात केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचाच डंका वाजेल, असे चित्र प्रचाराच्या आरंभीच पाहायला मिळाले.
नवलाख उंबरे गाव सहीत जाधववाडी, परीटवाडी, मिंडेवाडी आणि बधलवाडी इत्यादी ठिकाणी प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक गावात, वाडीवस्तीवर जात असताना मतदार उत्स्फूर्तपणे रॅलीत सहभागी होत होते. जनसमुदायाचा उत्साह पाहून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या विजयाचा मार्ग प्रशस्त असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सुनील शेळके यांनी दिली.

उमेदवारी अर्जानंतर आता प्रचाराची ही रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू झाली असून घराघरात पोहचून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. या निवडणुकीत विकासाच्या बाजूने उभे राहून मतदारांनी विकासासाठी आम्हाला मतदान करावे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या उमेदवार पल्लवी दाभाडे आणि पंचायत समितीचे उमेदवार राजेंद्र कडलक यांनी दिली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– ‘…त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलंच नाही’ ; मावळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमने – सामने
– निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर ; जागोजागी होतेय वाहनांची तपासणी
– राष्ट्रवादीकडे युतीसाठी कुठलाही प्रस्ताव नाही अन् मावळात राष्ट्रवादीसोबत युती नाही ! – बाळा भेगडे यांच्याकडून युतीला फुलस्टॉप
– इंदुरी – वराळे जिल्हा परिषद गटात राजकीय भूकंप ; प्रशांत भागवत, मेघा भागवत यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम