आज सोमवारपासून (19 डिसेंबर) राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु झाले आहे. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्वांचे लक्ष वेधले आणि चर्चा होऊ लागलीये, ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देवळालीच्या आमदार सरोज बाबुलाल अहिरे यांची. आमदार सरोज अहिरे या आज त्यांच्या अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन विधीमंडळ अधिवेशनात सहभागी झाल्या होत्या.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
https://youtube.com/shorts/HT–UXZQJIo?feature=share
आमदार सरोज अहिरे या 30 सप्टेंबर रोजी आई झाल्या. त्यानंतर आज त्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाल्या आहेत. सरोज अहिरे लहान बाळाला घेऊन विधानसभेच्या आवारात आल्या आणि माध्यमांनी त्यांना एकच गराडा घातला. एकीकडे लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी तर दुसरीकडे आई म्हणून जबाबदारी, अशा दोन्ही जबाबदाऱ्या लिलया पार पाडणाऱ्या अहिरे यांचे सध्या कौतूक होत आहे. ( NCP Woman MLA Saroj Ahire Attended Maharashtra Legislative Session At Nagpur With Her Two and Half Month Baby )
अधिक वाचा –
– गाडी रिव्हर्स घेताना काळजी घ्या, हा अपघात चालकांसह पालकांच्याही डोळ्यात अंजन घालणारा
– पालकांनो, मुलं सांगतात ती कारणे खरी की खोटी हे एकदा तपासून पाहा; अन्यथा ‘असा’ शोक करण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकते