दिव्यांगांना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगाना दिल्या जाणाऱ्या साहित्याचे वाटप मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. केंद्रीय सामाजिक मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या मान्यतेने खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम थेरगाव येथे राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, पनवेल आणि खालापूर या सहा विधानसभा मतदारसंघात या साहित्याचे वाटप केले जाणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिव्यांगांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्याच्या उपक्रमाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दिनांक 16 जून) थेरगाव येथे केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग बांधवास इलेक्ट्रिक सायकल दिली. मावळ लोकसभा मतदारसंघातील 271 लाभार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप केले जाणार आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये दिव्यांगांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून गरजू दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप केले जात आहे.
लोकसभा सदस्यांना एका टर्ममध्ये एकदाच अशाप्रकारे साहित्याचे वाटप करता येते. खासदार श्रीरंग बारणे यांनी मागील टर्म मध्ये दिव्यांग बांधवांना विविध साहित्याचे वाटप केले होते. त्याचप्रमाणे आता पुन्हा साहित्याचे वाटप केले जाणार आहे. शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम खासदार श्रीरंग बारणे करीत असतात. तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये राहून त्यांची कामे मार्गी लावल्यावर त्यांचा भर असतो.
दिव्यांगांच्या विविध संघटनांना विश्वासात घेऊन साहित्य वाटपाचे काम केले जात आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या या उपक्रमाला दिव्यांगांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अंधांसाठी काठी, कर्णबधिर व्यक्तींसाठी कानाचे मशीन, व्हील चेअर, टॉयलेट भांडे आणि इतर साहित्य देण्यात आले. बुधवारी (दि. 21) पनवेल, गुरुवारी (दि. 22) कर्जत, खालापूर व उरण आणि शुक्रवारी (दि. 23) मावळ येथे हा उपक्रम राबविला जाणार आहे. ( necessary materials distributed to disabled through maval lok sabha constituency mp shrirang barane )
अधिक वाचा –
– तब्बल 1 कोटी 72 लाख रुपयांच्या साळुंब्रे नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न
– राजमाची येथील वरे कुटुंबीयांचे आमदार सुनिल शेळकेंकडून सांत्वन, शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन