नेपाळ देशात भीषण विमान दुर्घटना घडली आहे. नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ रन वे पासून अवघ्या 10 सेंकद अलीकडे विमानाचा अपघात घडला. एटीआर-72 हे प्रवासी विमान 72 जणांना घेऊन काठमांडू ते पोखरा या मार्गावर होते. परंतू, पोखरा विमानतळावर लँडिंग करण्याच्या दहा सेकंद आधीच हे विमान अपघातग्रस्त झाले, ज्यात विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. ( Nepal Plane Crashed 72 Died Including 5 Indians )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नेपाळ मधील पोखरा येथे यती एअरलाइन्सचे विमान कोसळले असून ७२ प्रवासी घेऊन निघालेल्या या विमानात भारतीय नागरिक सुद्धा असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर दुर्घटना अत्यंत दुःखदायी आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भारतीय तसेच इतर नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 15, 2023
विमानाचा अपघात होताच विमानाला भीषण आग लागली. बचाव दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. विमानात 11 परदेशी पर्यटकांसह 3 नवजात मुले होती. अपघाताच्या वेळी विमानात 53 नेपाळी, 5 भारतीय, 4 रशियन, 1 आयरिश नागरिक, 2 कोरियन, 1 अर्जेंटिना आणि 1 फ्रेंच नागरिक होता, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या अपघाताबद्दल जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे.
अधिक वाचा –
– खुशखबर! राज्याचा गौरव वाढवणाऱ्या पैलवानांच्या मानधनात तीनपटीने वाढ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड भागातील विकासकामांचा आमदार शेळकेंकडून आढावा; किन्हई, चिंचोलीचा पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन